Join us

चर्चगेट रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:27 AM

मागील तीन महिन्यांपासून आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळत नाही.

मुंबई : मागील तीन महिन्यांपासून आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळत नाही. रेल्वेतून प्रवास करताना अचानक प्रवाशांची तब्येत खालावल्यास किंवा रेल्वे दुर्घटनेत जखमी झाल्यास त्वरीत वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू केली होती. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट रेल्वे स्थानकावर असलेले आपत्कालीन चिकित्सा कक्ष मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे जखमी प्रवाशांवर उपचार करणे अवघड झाले आहे.रेल्वे अपघातातील जखमी आणि रेल्वे प्रवासात प्रवाशांची तब्येत बिघडल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुससार मध्य आणि पश्चिम रेल्वेने या आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू केले. या आपत्कालीन वैद्यकीय केंद्राची जबाबदारी खासगी रुग्णालय आणि औषध निर्माण कंपन्यांना दिली आहे. मात्र यांना आपत्कालीन वैद्यकीय कक्ष चालविणे कठीण जात असल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील उभारण्यात आलेले आपत्कालीन वैद्यकीय केंद्र धूळखात पडून आहेत.चर्चगेट स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रेल्वेच्यावतीने भाडे तत्वावर दिले होते. यात काही डॉक्टर व परिचारिका, मदतनीस प्रवासी रुग्णांच्या सेवेसाठी या कक्षात उपलब्ध होते. प्रवाशांना प्राथमिक उपचाराबरोबर, रक्ततपासणी, आरोग्य तपासणी अल्पदरात उपलब्ध होत्या. मात्र, २० जानेवारी २०१९ पासून हे केंद्र बंद करण्यात आले आहे.>लवकरच देणार कंत्राटऔषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या प्रवासी रुग्णांची संख्या कमी होती. यात काम करणाºया कर्मचाऱ्यांचा पगार आवाक्याबाहेर असल्याने आपत्कालीन वैद्यकीय केंद्र अखेर बंद करण्यात आले आहे. मात्र दुसºया औषध कंपनीला किंवा रुग्णालयाला कंत्राट देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.