‘भाटिया’त आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र
By admin | Published: May 24, 2017 01:52 AM2017-05-24T01:52:51+5:302017-05-24T01:52:51+5:30
मुंबईसारख्या प्रचंड रहदारी असणाऱ्या शहरात तातडीने वैद्यकीय सेवा पुरविणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसारख्या प्रचंड रहदारी असणाऱ्या शहरात तातडीने वैद्यकीय सेवा पुरविणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. असे असले तरी तातडीची वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे केंद्र भाटिया रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे ही सेवा तातडीने पुरविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाच्या के.डी. जालन इमरजन्सी मेडिकल सर्विसेस सेंटर (ईएमएस) विभागाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाटिया रुग्णालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकरसी, सीईओ डॉ. राजीव बोधनकर, के.डी. जालन फाउंडेशनचे सुशीलकुमार जालन, आशिष जालन, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाटिया रुग्णालय हे मुंबईतील जुने आणि प्रथितयश रुग्णालय आहे. के.डी. जालन ट्रस्टच्या साहाय्याने हाती घेतलेले काम विस्ताराने व्हावे, अधिकाधिक सामान्य रुग्णांना या सेवेचा फायदा व्हावा. दरम्यान, भाटिया रुग्णालयाच्या नवीन इमरजन्सी मेडिकल सर्विसेस सेंटरला (ईएमएस) के.डी. जालन फाउंडेशनचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.