एल्फिन्स्टनसाठी हवी आपत्कालीन वैद्यकीय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:54 AM2017-10-30T01:54:55+5:302017-10-30T01:55:15+5:30

एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेला रविवारी एक महिना उलटला. मात्र, अजूनही या ठिकाणी ठोस कारवाई झालेली नाही; परंतु अशा दुर्घटना टाळण्यासाठी वा रेल्वे प्रवाशांना त्वरित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Emergency Medical Services for Elphinston | एल्फिन्स्टनसाठी हवी आपत्कालीन वैद्यकीय सेवा

एल्फिन्स्टनसाठी हवी आपत्कालीन वैद्यकीय सेवा

Next

मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेला रविवारी एक महिना उलटला. मात्र, अजूनही या ठिकाणी ठोस कारवाई झालेली नाही; परंतु अशा दुर्घटना टाळण्यासाठी वा रेल्वे प्रवाशांना त्वरित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वन रूपी क्लिनिकने पुढाकार घेतला आहे. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना केवळ एक रुपयांत ही सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेसारखी परिस्थिती उद्भवल्यास जवळपास एखादे आपत्कालीन सेवा पुरविणारे वैद्यकीय केंद्र असते, तर अधिकाधिक जलद गतीनेही त्या वेळी मदत करता आली असती, अशी माहिती वन रूपी क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी दिली. त्यामुळे परळ- एल्फिन्स्टन स्थानकासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि वन रूपी क्लिनिक सुरू करता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाला सोमवारी लेखी निवेदन देणार असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.
या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्वरित अपघातादरम्यान किंवा काही वेळा गर्भवतींना, ज्येष्ठ नागरिकांना मदतीची आवश्यकता भासते, अशा परिस्थितीत मदत करता येईल. तसेच, केवळ एक रुपयांत आरोग्यांच्या अन्य तक्रारींचे निवारण करता येईल, असेही डॉ. घुले म्हणाले.

Web Title: Emergency Medical Services for Elphinston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.