मुंबई : गिरगाव येथे मेक इन इंडियांतर्गत झालेल्या महाराष्ट्र रजनीतील अग्नितांडवानंतर महापालिकेला जाग आली आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यक्रमासाठी मंगळवारी तातडीने आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला. या मुद्द्यावरून महासभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. गिरगाव चौपाटी येथील दुर्घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी पालिकेच्या महासभेत उमटले़ शनिवारी गिरगाव चौपाटीवर पाहणी करून अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काही सूचना आयोजकांना केल्या होत्या़ त्यानुसार कार्यक्रमाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते़ सरकारी कार्यक्रम असल्याने या नियमांचे पालन झाले का याची खातरजमा झाली नाही, असा आरोप विरोधकांनी केला़ वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यक्रमाचाही आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार न करता परदेशी पाहुणे, लाखो नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यात आल्याची टीका काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी केली़ आगीच्या घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाकडून नियमावली तयार करण्यात आली असून, याचे उल्लंघन करणाऱ्या निवासी सोसायटी, उत्तुंग इमारती आणि कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो़ त्याचप्रमाणे महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयोजक विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेंमेंटवर कारवाई व्हावी, अशी मागणी महासभेत करण्यात आली़ महाराष्ट्र रजनीत महाराष्ट्राच्या परंपरांचे दर्शन होण्याऐवजी मुंबईतील सुरक्षा यंत्रणेचे पितळ उघडे पडले़ आगीची झळ मुंबईच्या प्रतिमेलाही बसली़ नियम धाब्यावर बसविल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे़ अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)आधुनिक यंत्रणेमुळे आगीवर पाण्याचा मारा करण्याची बंबाची क्षमताही वाढणार असून, देखभाल खर्च घटणार आहे़ या बंबांतून प्रति मिनिट ३५ किलो/से़मी़ ३०० लीटर पाण्याचा मारा करणे शक्य होणार आहे़ वर्षभराच्या प्र्रतीक्षेनंतर बुधवारी या बंबांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रभावशाली मदतकार्यासाठी १६ नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्यात आले आहेत़ ते अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टममुळे निसरड्या रस्त्यांवरून नेणे शक्य असून, इकोफें्रडली आहेत़ त्याचबरोबर स्वयंचलित ट्रान्समिशन प्रणालीमुळे आगीची वर्दी आल्यानंतरच्या प्रतिसादत्मक वेळेतही सुधारणा होणार आहे़ अग्निशमन दलामध्ये सुमारे ३ हजार जवान व अधिकारी आहेत़ दरवर्षी सरासरी ४ हजारांहून अधिक आगीच्या घटना घडतात़ तुटपुंजे मनुष्यबळ आणि मर्यादित साधनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांवरील ताण वाढत आहे़ त्यामुळे दलाचे हात मजबूत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला़ अहवालाची प्रतीक्षा : आगीचे कारण अहवालातूनच स्पष्ट होईल. व्यासपीठावर आतशबाजी करू नका, असा आदेश अग्निशमन दलाने दिला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याने आग लागल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आवाज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले की, ‘हा भाग शांतता क्षेत्रात येतो. उच्च न्यायालयाने या कार्यक्रमासाठी परवानगी दिली नव्हती तरीही त्यास सर्वोच्च न्यायालयातून परवानगी मिळवण्यात आली. चौपाटीवरील जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्र स्वरूप धारण केले.’
आगीनंतर बीकेसीत आपत्कालीन आराखडा
By admin | Published: February 17, 2016 2:30 AM