Join us

एसएमएस त्वरित येतो,पण लाइट काही येत नाही? यंदा पावसाळ्यात वीज कंपन्या सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:23 AM

ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊन मुंबईकरांना समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरणने कंबर कसली आहे.

मुंबई : ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊन मुंबईकरांना समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरणने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व आपत्कालीन यंत्रणा वीज कंपन्यांनी सज्ज ठेवल्या असून, मुंबईकरांना मदतीसाठी हेल्पलाइन नंबर देतानाच आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर काय करायचे? याची माहितीही दिली आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील बेस्टच्या वीज ग्राहकांना मात्र सतत खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. दुपारी किंवा रात्री सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून, बेस्टकडून काहीच मदत केली जात नसल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. टाटा पॉवरने ग्राहक सेवा केंद्रे अपग्रेड केली आहेत. ग्राहक आयव्हीआर (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) वर स्वयंचलित पद्धतीने तक्रार नोंदवू शकतात. कॉल सेंटर, टाटा पॉवर मोबाईल ॲप आणि व्हाॅट्सअॅपमार्फत समस्या नोंदवल्या जाऊ शकतात.

बेस्टच्या वीज ग्राहकांना चौपट वीज बिलांनी हैराण केले असून, सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. सायन-कोळीवाडा आणि भुलेश्वर येथील ग्राहकांना गेल्या दहा दिवसांपासून खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दुर्दैव म्हणजे वीज पुरवठा पूर्ववत कधी होणार? याची माहिती बेस्टकडून कधीच मिळत नाही, अशी माहिती ग्राहकांनी दिली.

काय आहे तयारी-

१) प्रमुख सब स्टेशन्समध्ये बचाव नौका आणि जीवरक्षक जॅकेट

२) आवश्यक उपकरणांनी सुसज्ज वाहने प्रमुख ठिकाणी तैनात

३) सबस्टेशन्समध्ये आवश्यक सुटे भाग

४) विविध नोड्सवर डेडिकेटेड क्विक रिस्पॉन्स टीम्स तैनात

टॅग्स :मुंबईमहावितरणवीज