मुंबई : विविध फसव्या योज़नांपाठोपाठ ठगांनी ईएमआय पुढे ढकलण्याच्या नावाखाली बँक कर्जदारांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे तुम्हालाही अशाप्रकारे फ़सवणुकीचा कॉल आल्यास बँकेची गोपनीय माहिती शेअर करू नका असे आवाहन सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म असलेल्या फसव्या लिंक तयार करून ऑनलाईन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामुळे अधिकृत लिंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले. त्यासोबतच प्रधानमंत्री बेरोजगार भत्त्ता योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून पैसे मिळतील, दोन महिन्यांसाठी नेटफिलक्स सेवा किंवा इंटरनेट सेवा मोफत देण्यात येईल, जीओचे पाचशे रुपयांचे रिचार्ज मोफत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रत्येकाला ६०जीबी इंटरनेट सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, आदी आमीषे समाजमाध्यमांवरून दाखविली जात आहेत. प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा आमीषांना बळी पडू नका, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाकडून होत असताना आता या सायबर भामटयांकडून बँक कर्जदारानाही टार्गेट केले आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरबीआयने सर्व बँकाना त्यांच्या ग्राहकास शक्य तितक्या डिजिटल बँकिंग सुविधेचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे सायबर गुन्हे गारांनीही हा धागा पकड़ून फ़सवणुक करण्यास सुरुवात केली. यात, सद्यस्थितीत विविध बँकानी त्यांचे ग्राहकांना कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकलन्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचाच फायदा घेत ही ठग मंडळी बँक अधिकारी / कर्मचारी बोलत असल्याचे सांगून त्यांचे बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती घेत फ़सवणुक करत असल्याचे मुंबई सायबर पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.
तसेच या ठगांनी खातेदारांना संदेश धाडून त्याद्वारे any desk, Quick Support, Team Viewer, Aur droid सारखे स्क्रीन शेअरिंग अप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईल व संगणकाचा अनधिकृत तांबा घेत फसवणूक करत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
................................
काय करावे...
नागरिकांनी कुठल्याही फसव्या संदेशाना बळी पडू नये. संदेशाची खातरजमा करावी. अनोळखी लिंक तसेच ऍप डाऊनलोड करू नये. कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नये. जेथे फसवणूक होतेय असे वाटत असल्यास पोलिसांकड़े तक्रार करण्यांचेही सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात येत आहे.