पोलिसांचा इमोशनल अत्याचार
By Admin | Published: April 30, 2015 01:48 AM2015-04-30T01:48:26+5:302015-04-30T01:48:26+5:30
पोलीस कर्मचाऱ्याने वेश्यावृत्तीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मॉडेलच्या मित्राकडून पैसे कसे उकळले याची चित्तरकथा एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी आहे.
पैशाची मागणी : बलात्कारी पोलिसांनी केला मॉडेलच्या मित्राचा छळ
डिप्पी वांकाणी ल्ल मुंबई
मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने वेश्यावृत्तीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मॉडेलच्या मित्राकडून पैसे कसे उकळले याची चित्तरकथा एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. त्याचा तपशील तक्रारीच्या रूपाने उघड झाला आहे. मात्र ही सारी हकिकत या मित्राने कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या रूपात दाखल केलेली नाही़
मॉडेलच्या या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तीन पोलीस कर्मचारी व एका महिलेसह आठ जणांच्या पथकाने पीडित मॉडेल आणि मनिंदरसिंग (नाव बदललेले आहे़) यांना ३ एप्रिल रोजी पंचतारांकित हॉटेलमध्ये पकडले होते. त्यानंतर एका पोलिसाने साकीनाका येथील संघर्ष चौकीत मॉडेलवर बलात्कार केला, तर त्याच्या साथीदारांनी सिंग यांना साकीनाका पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावर रात्रभर डांबून ठेवले. वेश्यावृत्तीच्या गुन्ह्याखाली आत टाकण्याची धमकी देत पोलिसांनी सिंग यांच्याकडे सात लाख रुपयांची मागणी केली. सिंग यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी जवळच्या व्यक्तीचा अपघात झाल्याचा बनाव करून ओळखीच्या लोकांकडून पैसे मागविण्याचे फर्मान सोडले. सिंग त्यांच्या मोबाइलवरून ओळखीच्या लोकांशी बोलत असताना एक पोलीस मोबाइलचा लाउड स्पीकर सुरू करून त्यांचे प्रत्येक संभाषण ऐकत होता. एवढेच नाही, तर फोन करण्यापूर्वी संबंधित क्रमांक ‘ट्रु कॉलर’ या सॉफ्टवेअरमध्ये टाकून तो क्रमांक नेमका कोणत्या व्यक्तीचा आहे याचीही तो शहानिशा करीत होता.
मी जाहिरात व जनसंपर्क क्षेत्रात काम करतो, असे मी त्यांना हजारदा सांगितले. माझ्या ग्राहकांत मुंबईतील राजकीय नेते नसीम खान यांचा समावेश आहे. अलीकडील विधानसभा निवडणुकीत मी त्यांच्यासाठी काम केले आहे, असे मी त्यांना सांगितले. मात्र जेव्हा जेव्हा मी त्यांचे नाव घेई तेव्हा तेव्हा पोलीस मला मारत. आम्ही तुला कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकवू व तुला चार रात्री कोठडीत घालवाव्या लागतील. तू पैसे न दिल्यास तुला फोडून काढू, अशी धमकीही त्यांनी दिली होती, असे ते म्हणाले.
च्आपण फोनवरून नसीम खान यांचे पुत्र आसिफ यांना एक एसएमएस पाठवून आपणास साकीनाका पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आल्याचे कळविले. आसिफ यांनी मला फोनवर पोलीस डायरीत अशी नोंद नसल्याचे कळविले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याला अनेकदा दूरध्वनी करून पोलीस अधिकाऱ्याचे नाव विचारले. मात्र प्रत्येकवेळी त्यांचा फोन कट करण्यात आला. अखेरीस आसिफ यांनी फोन करून पैसे देण्याऐवजी तू गुन्हा दाखल कर, असे मला सुचविले.
च्पीडितेने सुटकेसाठी तुम्हालाच दूरध्वनी का केला, या प्रश्नावर सिंग म्हणाले की, घटनेच्या चार - पाच तास आधी आम्ही एकमेकांशी फोनवर बोललो होतो. मी स्टुडिओत रात्री उशिरापर्यंत काम करतो हे ठाऊक असल्यामुळे माझी मदत
होऊ शकते, असे वाटून तिने मला फोन केला.