Inspirational Thought: मुंबईची आजीबाई, वय वर्ष ८७! भीक मागत नाही, मेहनत करून खाते...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:24 PM2022-01-12T13:24:33+5:302022-01-12T13:24:48+5:30

Inspirational Thought of Sarasvati Patel from Mumbai: मुंबई सारख्या वेगवान शहरात शिक्षण, नोकरी, पैसे हे सगळं मिळवण्यासाठी माणूस प्रचंड मेहनत घेतो. पण जेव्हा एक वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण होते, किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी कोणता मार्ग सापडत नाही तेव्हा मात्र काही माणसांचं आयुष्य थांबतं.

Emotional Story: Grandmother from Mumbai, age 87! Didn't beg, work hard to live | Inspirational Thought: मुंबईची आजीबाई, वय वर्ष ८७! भीक मागत नाही, मेहनत करून खाते...

Inspirational Thought: मुंबईची आजीबाई, वय वर्ष ८७! भीक मागत नाही, मेहनत करून खाते...

googlenewsNext

- अल्पेश करकरे 
मुंबई : हे मुंबई शहर... या शहरात अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.या शहरात अनेक सकारात्मक नकारात्मक गोष्टी आपण दररोज ऐकतो पाहतो.याच मुंबई शहरात पोटासाठी रक्ताचे पाणी करून कमवून खाणारे आणि दुसरीकडे काहीही काम न करता भिक्षा मागून खाणारे असा विरोधाभास दैनंदिन जीवनात सकाळपासून रात्रीपर्यंत पहावयास मिळतो. मात्र मुंबईत धडधाकट असताना भिक्षा मागून जगणार्‍या लोकांपेक्षा वेगळे आणि एक जगायला ऊर्जा देणारं चित्रही पाहायला मिळतं. 

 या मुंबई सारख्या वेगवान शहरात शिक्षण, नोकरी, पैसे हे सगळं मिळवण्यासाठी माणूस प्रचंड मेहनत घेतो. पण जेव्हा एक वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण होते, किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी कोणता मार्ग सापडत नाही तेव्हा मात्र काही माणसांचं आयुष्य थांबतं. पण या मुंबईच्या रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्या 87 वर्षांच्या सरस्वती पटेल आज्जीचं आयुष्य अजिबात थांबलं नाही. कोशीश करने वालो की हार नही होती म्हणतात ना, तसंच आजी प्रचंड मेहनत करतात. रोज .मानखुर्द हुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येतात. आपल्या मुलासह  मुंबई पत्रकार संघाचा फुथपाथवर बसून फळ विकतात.दिवसभराची जमलेली पुंजी घेऊन पुन्हा घर गाठतात. वयोवृद्ध असतानाही त्या रोज नित्यनेमाने हे सगळं करतात. 

मुंबईत अनेक परदेशी पर्यटक  येतात, ते या शहरात भीक मागणाऱ्या लोकांना पाहून इंडिया इज अ पूअर असं सांगत फिरतात . मात्र या शहरात अनेक काबाड कष्ट करणारे लोकं या पर्यटकांना दिसत नाहीत का ? असा प्रश्न या सीएटी येथील सरस्वती आज्जीची स्टोरी पाहून पडल्याशिवाय राहणार नाही.ही आज्जी गेल्या 45 वर्षांपासून रोज मानखुर्द ते सीएसटी असा प्रवास करत, फळ विक्री करून पोट भरते.दिवसाला 700 ते 800 रुपये कमावते. तिच्यासह तिचा मुलगा देखील सोबत असतो ,तसेच घरी एक मुलगी आहे ती देखील कामाला जाते. ही आज्जी मूळची सुरत गुजरातची आहे. पण मुंबईमे दिल लगता है ! म्हणत कमाके खाने अच्छा लगता है ! भीक मांगना बुरा आहे असं आज्जी सांगते. एकीकडे भिक्षा मागणारी लोकं आणि दुसरीकडे ही आज्जी, प्रचंड विरोधाभास असल्याचं चित्र दिसतं.

 काही माणसं "पैसा कमवण्यासाठी कष्ट करण्याला" आयुष्य समजतात. पण या आजींसारखी लोकं एक वेळची भूक भागवण्यासाठी प्रचंड मेहनत करून जगण्यासाठी संघर्ष करतात. आणि अशी माणसं समाजाला समाजातल्या प्रत्येक घटकाला कुठल्या ना कुठल्या मार्गानं जगण्यासाठी उर्मी आणि बळ देत राहतात. जगण्यासाठीचा संघर्ष करत राहतात.

Web Title: Emotional Story: Grandmother from Mumbai, age 87! Didn't beg, work hard to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.