Join us  

Mumbai: पर्यटन कौशल्य प्रशिक्षणावर भर देणार, डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन संचालक  

By स्नेहा मोरे | Published: January 24, 2024 8:28 PM

Mumbai News: पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्य प्राप्त व्हावीत म्हणून पर्यटन कौशल्य विकासाच्या विविध योजना आणल्या जात आहेत, असे पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

मुंबई - पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्य प्राप्त व्हावीत म्हणून पर्यटन कौशल्य विकासाच्या विविध योजना आणल्या जात आहेत, असे पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले. पर्यटनामध्ये नाविन्यपूर्ण कौशल्य विकसित करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शासनाच्या विविध योजना या पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या असल्याचेही पाटील यांनी अधोरेखित केले.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत आयोजित पर्यटन परिषदेत ते बोलत होते. बुधवारी बीकेसी येथील हाॅटेलमध्ये पार पडलेल्या 'पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन कौशल्य विकसित करणे' या चर्चासत्रात पर्यटन संचालक डॉ. पाटील बोलत होते. यामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे मोहम्मद अख्तर, ईटीचे आशुतोष सिन्हा यांचा सहभाग होता. 'पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन कौशल्य विकसित करणे' या चर्चासत्रात शाळा, महाविद्यालय आणि खासगी संस्थासह शासनाच्या समन्वयातून पर्यटनासाठी कुशल मनुष्यबळ विकसित तयार करण्यासाठी काम होणे गरजेचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 'महाराष्ट्राचे ग्रामीण पर्यटनाचे व्हिजन' या विषयावर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अधिकारी कामाक्षी माहेश्वरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी, शाश्वत पर्यटन विकासासाठी शासन आणि खाजगी उद्योजकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याबाबत तज्ज्ञांनी विचार मांडले.  

टॅग्स :मुंबईपर्यटन