लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या काळात कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य शासन सोशल ऑडिट करण्यास सकारात्मक असून, महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेवर भर देण्यात येईल. याद्वारे नोंदणीकृत कामगारांना शासनाच्या योजनांचा फायदा, अर्थसाहाय्य देता येईल.
आज असंघटित क्षेत्रात अनेक कामगार काम करीत असून, या कामगारांचे नोंदणीकरण वेळेत करणे यावर येत्या काळात भर देण्यात येईल. सध्या ऑनलाइन नाेंदणी सुरू असून, येत्या काळात कामगारांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी करण्यावर भर देण्यात येईल. नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीतून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. घोषणेच्या अंमलबजावणीसाठी कामगार विभाग काम करत आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी जवळपास ४.५० लाख घरेलू बांधकाम कामगारांची नोंदणी केली होती. या घरेलू कामगारांनी पुनर्नाेंदणी केली नसली तरी या सर्वांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी कामगार विभाग काम करणार आहे.
.......................