कुर्ला येथील प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:06 AM2021-08-12T04:06:29+5:302021-08-12T04:06:29+5:30
मुंबई : कुर्ला येथील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या समवेत संबंधित अधिकाऱ्यांसोबत ...
मुंबई : कुर्ला येथील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या समवेत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
या बैठकीदरम्यान नेहरूनगर, टिळकनगर, नवीन टिळक व सहकारनगर येथील जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांच्या उन्नतीकरण आणि नूतनीकरण, कुर्ला पूर्व पश्चिम भुयारी मार्गामधील दुरुस्तीकरण आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई, स. गो. बर्वे मार्ग कुर्ला पूर्व आणि पश्चिमवरील पूर्णत्वास आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होऊनदेखील पीछेहाट जागेचे महानगरपालिकेस हस्तांतरण, म्हाडाच्या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे दुरुस्ती काम, चेंबूर - सांताक्रूझ जोडरस्त्याच्या पुलावरून खाली लोकमान्य टिळक टर्मिनलला उतरण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पुलाचे काम, टिळकनगर पश्चिमेकडील नाल्यावर असलेल्या जीर्ण पुलाचे नूतनीकरण, कुर्ला पूर्वेकडील मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भूखंडास संरक्षक भिंत बांधून सुरक्षित करणे तसेच या ठिकाणी मार्केटची इमारत बनण्याबाबत, त्यालगत असलेला बेस्टच्या जागेचा पुनर्विकास होण्याबाबत, टिळकनगर अग्निशमन केंद्राकरिता आरक्षित असलेल्या म्हाडाचा भूखंड हस्तांतरण प्रक्रियेस जलदता आणण्याबाबत आदी मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी माहिती कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली.