Join us

इंधन दरासह महागाई नियंत्रणावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:06 AM

कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला संसदेत सादर होईल. पण कोरोनामुळे ...

कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला संसदेत सादर होईल. पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचे दर कमी करावेत. तसेच महागाई नियंत्रणात आण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा गृहिणींनी मांडली.

---------

मनमोहन सिंग यांचे सरकार होत तेव्हा कच्च तेल १५० डॉलर प्रति बॅरल होत तरी तेव्हा पेट्रोल ७० ने मिळत होते. मोदी आल्यापासून कच्च तेल ५० डॉलरपर्यंत खाली आले तरी पेट्रोल ९१च्या वरती गेले आहे. त्यामुळे महागाई मोठ्याप्रमाणात वाढते सर्व जीवनावश्यक वस्तू महाग होतात. त्यामुळे सरकारने इंधन दर आटोक्यात आणावे त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील.

नम्रता सोनावणे, गृहिणी

केंद्र सरकारने येत्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेला प्राधान्य द्यावे. देशभरात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने होत आहेत. महिला अत्याचातील दोषींना कठोर शासन व्हावे. आज गॅस भाव वाढले आहेत, महागाई वाढली आहे त्यामुळे गृहिणींना घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

स्वाती डबडे, गृहिणी

आता आपल्याला अनेक गोष्टी घरपोच मिळत आहेत. मात्र बँक आणि इतर गोष्टींसाठी ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभा राहावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना या सोयी-सुविधा घरपोच मिळाव्यात यासाठी सरकारने तरतुदी कराव्यात.

छाया नाईक, गृहिणी

केंद्र सरकारने नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र रोजगार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. घरचालविताना महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना आहे, पण त्याची प्रक्रिया सुलभ करावी.

भाग्यश्री जाधव, गृहिणी