मुंबई : वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तुंबलेली गटारे, अस्वच्छ परिसर, जागोजागी पाण्याने भरलेली डबकी, डांबराच्या टाकीत साचलेले पाणी, इतरत्र पसरलेला कचरा इत्यादी समस्यांमुळे वसाहतीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शासकीय वसाहतीत घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.पावसाळा सुरू झाल्यावर इमारतींच्या छतावर डांबर टाकायला सुरुवात करण्यात आली आहे. डांबर टाकण्याचे काम पावसाच्या आधी करणे गरजेचे असताना ते पावसात केले जात आहे. सध्या एकाच इमारतीच्या छतावर डांबर टाकून झाले आहे. पण इतर इमारतींच्या घरांमध्ये पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे रहिवाशांनी घरातील छतांवर प्लॅस्टिक बांधले आहे.डांबरासाठी वापरण्यात येणारे पिंप परिसरात तसेच ठेवण्यात आले असून त्यात आता पावसाचे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरियासारखे आजार परिसरात उद्भवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली होती. त्या वेळी रंगकामासाठी बांबूचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु, रंगाचे काम झाले असून बांबू सहा महिन्यांपासून तेथेच पडून आहेत.या सर्व प्रकाराकडे बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची माहिती आझाद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी दिली.>तक्रारकोणाकडे करावी?शासकीय वसाहतीत इतक्या समस्या आहेत की, आता तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.वसाहतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयात असून तेथे समस्या लिहिण्यासाठी नोंदवही ठेवण्यात आली आहे. परंतु नोंदवहीतील समस्या त्वरित मिटवण्यात येत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
शासकीय वसाहतीत घाणीचे साम्राज्य, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:39 AM