बँक विलिनीकरणाविरोधात कर्मचारी मैदानात; तीव्र आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:08 PM2018-12-26T20:08:18+5:302018-12-26T20:15:16+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी व अधिका-यांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला.

employees against Bank merger; protest of employees | बँक विलिनीकरणाविरोधात कर्मचारी मैदानात; तीव्र आंदोलनाचा इशारा

बँक विलिनीकरणाविरोधात कर्मचारी मैदानात; तीव्र आंदोलनाचा इशारा

Next

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी व अधिका-यांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी शेकडो कर्मचारी व अधिकारी यूनायटेड फोरम ऑफ बँक युनीयन्सच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी आझाद मैदानात एकटवले होते. सरकार जबरदस्तीने बँकांचे विलिनीकरण करत असल्याचा आरोप करत पुढील आठवड्यात बैठक घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी यावेळी दिला.

 मुंबई महानगरातील बँक कर्मचारी, तसेच अधिका-यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता निदर्शनाला सुरूवात केली. यावेळी युनायटेड फोरमच्या पदाधिका-यांना सरकारी धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. बँकांचे एकत्रिकरण बँक ग्राहकांच्या, कर्मचारी, तसेच अधिका-यांच्या हिताचे नसल्याचा आरोप तुळजापूरकर यांनी केला. तुळजापूरकर म्हणाले की, प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला स्वत:चा इतिहास, भुगोल आणि संस्कृती आहे. या परिस्थितीत सरकारने जर या बँकांचे जबरदस्तीने विलिनीकरण केले, तर ही संबंधित बँकांच्या ग्राहकांवर जबरदस्ती होईल. म्हणूनच या अन्यायाविरोधात युनायटेड फोरमने देशव्यापी संप करून सरकारच्या विरोधातील संताप आणि राग व्यक्त केला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकातून या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा युनियनने केला आहे. मुंबईतील बहुतेक बँकांच्या शाखांचे शटर बुधवारी सकाळपासून बंद दिसले. अर्धवट शटर उघडे असलेल्या बँक शाखेत सफाई कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे रोख रक्कम भरणे-काढणे, धनादेश वठणावळ असे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. जुन्या खाजगी बँकातील कर्मचारी तसेच अधिकारी व काही विदेशी बँकातील कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले होते. 

पडती बाजू घेऊ नका!
सरकारने मोठ्या थकित कर्जांच्या वसूलीसाठी कठोर पाऊले उचलली, तरच बँकिंग उद्योग आजच्या अरिष्टातुन बाहेर पडेल, अशी भूमिका युनियनने व्यक्त केली. सरकार ५० ते ६० टक्के रक्कम माफ करून कर्ज बुडव्यांसमोर कमीपणा घेत आहे. सरकारने जर बँक एकत्रीकरणाच्या प्रश्नावर फेरविचार केला नाही, तर यूनायटेड फोरम हे आंदोलन अधिक तीव्र करेल. त्यासाठी यूनायटेड फोरमचे राष्ट्रीय प्रतिनीधी पुढील आठवड्यात ठोस निर्णय घेतील, असेही युनियनने स्पष्ट केले.

पुरस्कारासाठी आवाहन
मुंबई : कुलाब्यातील महिला विकास मंडळातर्फे राज्यातील महिला, मुले व वृद्धांसाठी उल्लेखनीय कार्य करणा-या सामाजिक संस्थेला कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मानपत्र, मानचिन्ह व २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या महिलेस मानपत्र, मानचिन्ह व २१ हजार रुपये रोख अशा स्वरूपाचा सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

Web Title: employees against Bank merger; protest of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.