कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना बेस्ट समितीचेही समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:07 AM2019-01-05T01:07:32+5:302019-01-05T01:07:46+5:30
बेस्ट उपक्रमातील आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ कर्मचा-यांना बसू लागली आहे. सानुग्रह अनुदानाचे केवळ आश्वासन, उशिरा मिळणारे वेतन, भात्यांमध्ये कपातीमुळे कर्मचाºयांमध्ये रोष आहे.
मुंबई : बेस्ट उपक्रमातील आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ कर्मचा-यांना बसू लागली आहे. सानुग्रह अनुदानाचे केवळ आश्वासन, उशिरा मिळणारे वेतन, भात्यांमध्ये कपातीमुळे कर्मचाºयांमध्ये रोष आहे. यामुळे आंदोलनाच्या तयारीत असलेल्या कर्मचाºयांना आता बेस्ट समिती सदस्यांचेही समर्थन मिळू लागले आहे. कर्मचाºयांच्या प्रश्नावरून महाव्यवस्थापक गंभीर नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला. विरोधी पक्षनेते रवी राजा याना प्रशासनाच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार, बेस्ट समितीची बैठक शुकवारी तहकूब करण्यात आली.
बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन करणे, वेतन करार, सानुग्रह अनुदान, कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्न आदी मागण्या प्रलंबित आहे. पाठपुरावा करूनही प्रशासन याबाबत उदासीन आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. निवृत्त कर्मचाºयांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न, संपाबाबत उपक्रमाकडून अध्यक्षांना सांगितले जात नाही, संपाची सर्वत्र चर्चा होत असताना महाव्यवस्थापक गंभीर नाहीत, असा आरोप माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केला.
बेस्टच्या निषेधार्थ बेस्ट समितीची बैठक तहकूब करण्याची सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मांडली. य नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र, याबाबत स्पष्टीकरण देताना काही निवृत्त कर्मचाºयांना ग्रॅच्युटीची रक्कम दिली आहे. पालिकेने दिलेल्या दहा कोटी रुपये निधीतून कर्मचाºयांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, तसेच भविष्यात कर्मचाºयांच्या निवास्थानांच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे आणखी २० कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.