Join us

कर्मचाऱ्यांची ‘स्वप्नपूर्ती’

By admin | Published: May 27, 2015 12:31 AM

शंभर वर्षांहून जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या राजभवनातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची नव्या घरांची स्वप्नपूर्ती मंगळवारी पूर्ण झाली.

मुंबई : शंभर वर्षांहून जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या राजभवनातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची नव्या घरांची स्वप्नपूर्ती मंगळवारी पूर्ण झाली. या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या १४ मजली इमारतीच्या बी विंगचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कर्मचाऱ्यांना बी विंगमधील नव्या सदनिकांचा ताबा देण्यात आला.कर्मचारी वास्तव्य करत असलेल्या शंभर वर्षांहून जुन्या मोडकळीस आलेल्या चाळी पाडून कर्मचाऱ्यांसाठी एकच बहुमजली इमारत बांधावी व प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ३५० चौरस फुटांचे घर द्यावी, अशी सूचना तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केली होती. त्यानुसार २००४ मध्ये राजभवनातील पहिल्या बहुमजली इमारतीचे भूमिपूजन पार पडले. १० मे २०११ रोजी या इमारतीच्या ए विंगचे काम पूर्ण होताच ६८ कर्मचाऱ्यांना ताबा देण्यात आला होता. (प्रतिनिधी)च्या इमारतीमध्ये एकूण ६३ सदनिका असून पहिल्या ते नवव्या मजल्यांवर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरिता ३६० चौ.फू. क्षेत्रफळ आकाराच्या ४३ सदनिका आहेत. च्दहाव्या मजल्यापासून चौदाव्या मजल्यापर्यंत तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी २ व १ बेडरूम असलेली प्रत्येकी ४९० चौ.फू. क्षेत्रफळाच्या २० सदनिका आहेत. च्या बहुमजली इमारतीच्या दोन्ही विंग पूर्ण झाल्यामुळे एकूण १३१ कुटुंबे यामध्ये राहणार आहेत. या इमारतीचा स्थापत्य व विद्युत कामावर १९.१५ कोटी रुपये खर्च झाले.