रुग्णसेवा शाखेतील कर्मचारी वर्गाचीही होणार नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:23 AM2017-12-26T06:23:57+5:302017-12-26T06:24:00+5:30

मुंबई : वैद्यकीय व आरोग्यसेवा क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणा-या रुग्णसेवेत कार्यरत कर्मचारी वर्गाची आता लवकरच नोंदणी केली जाणार आहे.

Employees in the staff of the Veterinary Service will also be enrolled | रुग्णसेवा शाखेतील कर्मचारी वर्गाचीही होणार नोंदणी

रुग्णसेवा शाखेतील कर्मचारी वर्गाचीही होणार नोंदणी

Next

मुंबई : वैद्यकीय व आरोग्यसेवा क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणा-या रुग्णसेवेत कार्यरत कर्मचारी वर्गाची आता लवकरच नोंदणी केली जाणार आहे. ब-याचदा रुग्णांवर उपचार करताना रुग्णांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्याची जबाबदारी या घटकाकडे असते. रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी केंद्र सरकारद्वारे सर्व कर्मचा-यांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय प्रयोगशाळा, सीटी स्कॅन विभाग, एमआरआय अशा सर्व विभागांमध्ये जवळपास २१ पदांवर रुग्णसेवा कर्मचारी कार्यरत असतात. बºयाचदा शैक्षणिक पात्रता नसलेले व कुठल्याही पद्धतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण नसलेल्या व्यक्ती रुग्णसेवा शाखेत कार्यरत असतात. हा प्रकार रोखण्यासाठी व कर्मचाºयांची नोंद करून घेण्यासाठी सोसायटी आॅफ इंडियन रेडिओग्राफर्स ही संस्था गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील पॅरामेडिकल कर्मचाºयांची नोंदणी करून घेणार आहे.
याविषयी सोसायटी आॅफ इंडियन रेडिओग्राफर्स संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक शंकर भगत यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, परिचारिकांची नोंद ठेवणाºया अनेक संघटना आहेत. मात्र रुग्णसेवा शाखेविषयी असे कार्य केले जात नाही. त्यामुळे आता या नव्याने करण्यात येणाºया नोंदणीनंतर अधिक पारदर्शी चित्र स्पष्ट होईल.

Web Title: Employees in the staff of the Veterinary Service will also be enrolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.