Join us  

स्वच्छतेच्या दोन तासांना कर्मचारी वैतागले

By admin | Published: December 12, 2014 12:51 AM

केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी करीत पालिकेने आपल्या सर्व कर्मचा:यांना सक्तीच्या सफाई मोहिमेत उतरविल़े राष्ट्रीय कर्तव्य असल्याने कर्मचा:यांनी हातात झाडू घेतल़े

मुंबई : केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी करीत पालिकेने आपल्या सर्व कर्मचा:यांना सक्तीच्या सफाई मोहिमेत उतरविल़े राष्ट्रीय कर्तव्य असल्याने कर्मचा:यांनी हातात झाडू घेतल़े मात्र विरार, बदलापूर, अंबरनाथला राहणा:या कर्मचा:यांना दर शुक्रवारी सक्तीचे हे दोन तास डोकेदुखीचे ठरू लागले आहेत़ विशेषत: महिलावर्गाची कौटुंबिक जबाबदारींमुळे यात धावपळ होत असल्याने यामध्ये वेळेची सवलत देण्याची मागणी जोर धरू लागली आह़े
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान जाहीर केले आणि पालिकेनेही तोच आदर्श घेऊन स्वच्छ मुंबई मोहीम सुरू केली़ या अंतर्गत कर्मचारी-अधिकारी यांना दर शुक्रवारी कार्यालयीन वेळेनंतर दोन तास व नागरिकांना दर शनिवारी वॉर्डात दोन तास श्रमदानाची वेळ निश्चित करण्यात आली़ कर्मचारी/ अधिका:यांसाठी ही जबाबदारी सक्तीची करण्यात आली़
मात्र संध्याकाळी साडेपाचनंतर दोन तास श्रमदान करून  त्यानंतर विरार, अंबरनाथला राहणा:या कर्मचा:यांना पोहोचण्यास  उशीर होतो़ यामध्ये महिला कर्मचा:यांची सर्वाधिक कुचंबणा होत आह़े अनेकांची मुले लहान असल्याने त्यांना पाळणाघरात ठेवण्यात येते. त्यामुळे दर शुक्रवारी मुलांना पाळणाघरात  ठेवणो  शक्य होत नसल्याने स्वच्छतेच्या डय़ुटीमध्ये सवलत मिळण्याची  मागणी महिला कर्मचा:यांकडून होत आह़े (प्रतिनिधी)
 
आयुक्तांना साकडे
सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी या प्रकरणी आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्रद्वारे साकडे घातले आह़े महिला कर्मचा:यांना दोन तास थांबविण्याऐवजी दुपारी जेवणाच्या वेळेत व सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर अर्धा तास स्वच्छता अभियानाच्या कामाकरिता थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली आह़े