मुंबई : बेस्ट संपाच्या दुसºया दिवशी शहरात हजारो प्रवाशांचे हाल झाले. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कुलाबा, चर्चगेट या दिशेने जाणाºया प्रवाशांचे हाल झाले. शेअर टॅक्सी आणि एसटी प्रशासनाने काही प्रमाणात सोडलेल्या बसेसनंतरही या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाºया प्रवाशांना पायपीट करावी लागली. मात्र प्रशासनाने मेस्माअंतर्गत कामगारांवर कारवाईस सुरुवात केल्याने नाराज झालेल्या कर्मचाºयांच्या पत्नींनी वडाळा आगारावर गुरुवारी सकाळी धडक मोर्चाची हाक दिली आहे.
सीएसएमटी येथून जिल्हाधिकारी कार्यालय, गेट वे आॅफ इंडिया, चर्चगेट, मंत्रालय या ठिकाणी मोठ्या संख्येने शेअर टॅक्सी वाहतूक सुरू असते. मात्र रेल्वे स्थानकाबाहेर असलेला बेस्ट डेपोतून एकही बस बाहेर निघाली नसल्याने हा सर्व प्रवाशांचा ताण टॅक्सी सेवेवर पडला. दरम्यान, एसटी प्रशासनाने या ठिकाणाहून काही बसेस रवाना केल्या. मात्र त्यांची संख्या फारच तोकडी होती. अखेर बहुतेक प्रवासी या मार्गावरून पायी प्रवास करताना दिसले. हीच कसरत चर्चगेट रेल्वे स्थानकाहून सीएसएमटी, गेट वे आॅफ इंडिया, मंत्रालय गाठणाºया प्रवाशांना करावी लागली.
दक्षिण मुंबईतील बॅक बे आगार, कुलाबा बस डेपोमधील कर्मचाºयांनी कामावर दांडी मारत मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर गर्दी केली होती. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी कर्मचाºयांना हटकले. त्या वेळी कर्मचाºयांनी काही काळ आझाद मैदानात एकवटत प्रशासनाच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. या वेळी काही कर्मचाºयांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला. तसेच लोकशाही मार्गाने कर्मचारी संप सुरूच ठेवणार असून कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेणार नसल्याचेही सांगितले.संपाला सिटूचा पाठिंबा बेस्ट कामगारांवर मेस्माअंतर्गत कारवाई करत संप दडपण्याचा प्रयत्न करणाºया प्रशासनाचा सिटू या केंद्रीय कामगार संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. कामगार संघटनांच्या कृती समितीसोबत चर्चा करून प्रशासनाने मार्ग काढण्याची गरज आहे. याउलट संप चिरडण्याचा प्रयत्न करणाºया प्रशासनाविरोधात सिटू कृती समितीसोबत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी व्यक्त केली आहे.वडाळा आगारावरही धडकणारच्बेस्ट कर्मचाºयांनी पुकारलेला संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने बेस्ट वसाहतींमध्ये राहणाºया कर्मचाºयांना घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत कर्मचाºयांच्या पत्नी एकवटल्या आहेत.च्बेस्टच्या वडाळा आगारावर गुरुवारी सकाळी ११ वाजता कर्मचाºयांच्या पत्नी धडक मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने दिली आहे.