Join us

एसटीची वसुली झाली तरच कर्मचाऱ्यांना पगार मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:06 AM

मुंबई : आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीला कोरोनाचा फटका बसला आहे. असे असताना काही विभागांकडे एसटी महामंडळाचे देणे बाकी ...

मुंबई : आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीला कोरोनाचा फटका बसला आहे. असे असताना काही विभागांकडे एसटी महामंडळाचे देणे बाकी आहे. मात्र, ते वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अडचणी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलसेवा बंद होती. त्यामुळे बेस्टच्या मदतीला एसटी पाठविण्यात आल्या होत्या. त्याचे नियोजन बेस्ट करत होती तर देणी मुंबई महापालिका देत होती. मुंबई महापालिकेने एसटीला ५० कोटींची देणी दिली असून ९० कोटींची देणी थकली आहेत.

शासनामार्फत काही घटकांसाठी तिकीट सवलतीच्या याेजना राबाविल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत, अपंगांसाठी ७५ टक्के सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ६६ टक्के तिकीट सवलत व विद्यार्थिनींसाठी १०० टक्के माेफत पास सवलत याेजना आदी योजना रावबिल्या जातात. सवलतीची रक्कम वगळता उर्वरित रक्क्कम संबंधित लाभार्थीला भरावी लागते. सवलतीची रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला दिली जाते. मुंबईत रेल्वे बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा दिली होती.

आधीच आर्थिक संकटात असलेल्या कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासून एसटीची चाके थांबली.त्यामुळे महामंडळाला रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा झालात्यामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार रखडत होते.

त्यावर परिवहनमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली आणि यावर मार्ग काढण्यात आला होता. शासनाकडून एसटीसाठी आर्थिक मदत दिली जात आहे.

महापालिकेकडे कोटींची देणी थकली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी ई. लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली होती. बेस्टच्या ताफ्यातील एसटीचे नियोजन बेस्ट करत होती तर देणी मुंबई महापालिका देत होती. मुंबई महापालिकेने एसटीला ५० कोटींची देणी दिली असून ९० कोटींची देणी थकली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट सेवेत एसटीच्या १००० गाड्या होत्या. मात्र, टप्प्याटप्याने गाड्या कमी केल्या असून सध्या २५० गाड्या बेस्ट सेवेत आहेत. बेस्ट सेवेत असलेल्या गाड्या आणि कर्मचारी यांचा खर्च पालिका करत आहे. मुंबई महापालिकेने ९० कोटी थकले आहेत.

एसटी महामंडळ आता आर्थिक अडचणीत सापडले असल्याने ही रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

-वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

ग्रामीण भागाला शहरासाेबत जाेडण्याचे एसटी हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. काेराेनामुळे एसटीची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. शासन ज्याप्रमाणे इतर घटकांना मदत करीत आहे, तसेच एसटीलाही आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

कर्मचारी, एसटी महामंडळ

मुंबई विभागातील एकूण आगार - ५

एकूण कर्मचारी - १८३०

सध्याचे दरराेजचे उत्पन्न - ४०००००

महिन्याला पगारावर हाेणार खर्च - ४ काेटी