मुंबई/अहमदनगर : राज्याच्या विविध शहरांमधील शहरांमधील गणेशमूर्तींच्या विक्रीचा आढावा घेतला असता, या शहरांमध्ये २२ लाखांपेक्षा अधिक मूर्ती विक्रीला आल्या होत्या. या विक्रीतून १२७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त जणांना रोजगार मिळाला आहे. पुरुष-महिलांसह हंगामी रोजगाराची संधी म्हणून मूर्तीविक्रीच्या या उद्योगात तरुणही होते. दुष्काळ, महागाई, मंदीचा फटका यामुळे राज्यात सरासरी विक्रीत १० टक्के घट झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.
नगरचे ५० टक्के कारखानदार पेणहून कच्चा माल आणायचे. तेथून आणलेल्या साच्यातील मूर्तींना नगरमध्ये आणून रंग द्यायचे. यंदा मात्र पेण येथील कारखानदारांनी धोरण बदलले आहे. नगरसह राज्यातील रंग देणाऱ्या कारागिरांनाच त्यांनी पेणमध्ये बोलावून तयार मूर्तींची थेट विक्री केली. त्यामुळे यंदा नगरमध्ये तयार होणाºया मूर्तींमध्ये १० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गणेशमूर्तींची उलाढालजिल्हा विक्रीसाठी मूर्ती (संख्या) उलाढाल (रुपये) रोजगार(व्यक्ती) गतवर्षीपेक्षा विक्रीअहमदनगर ४ लाख ५० हजार ७ कोटी ३५०० १० ते १५ टक्के घटमुंबई २ लाख २ हजार ५४० ५८ कोटी १४ हजार ७०० ५ टक्के वाढधुळे ६१ हजार ५०० २ कोटी ८०० १० टक्के वाढनंदुरबार ७० हजार ५ कोटी १५०० ५ टक्के वाढसांगली २ लाख ५ हजार ६ कोटी २५०० २५ टक्के घटनाशिक ३ लाख ७५ हजार १५ कोटी २५०० ५ टक्के वाढऔरंगाबाद ३ लाख ७ कोटी ५० लाख २००० १५ टक्के जास्तजळगाव १ लाख ५५ हजार ३ कोटी १००० वाढ-घट नाहीसातारा १ लाख २५ हजार ४ कोटी ५० लाख १५०० वाढ-घट नाहीसोलापूर २ लाख२५ हजार ९ कोटी ५० लाख १५०० १० टक्के जास्तअकोला १ लाख १० कोटी १५०० ५ टक्के वाढकोल्हापूर १ लाख ३० हजार १० कोटी २५०० १० टक्के घटदुष्काळी स्थितीत तयार झालेल्या मूर्तींची संख्या अधिक असल्याने किमतीमध्ये १५ टक्के घट झाली. महापुरामुळे उत्साह नसल्याने कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत मूर्ती पाठविण्याचे धाडस केले नाही. परिणामी, मूर्तींच्या विक्रीत १५ ते २० टक्के घट झाली.-जयकुमार रोकडे, मूर्तिकार, अहमदनगर