'सॅटेलाईट कॅम्पसमुळे गावात रोजगाराची संधी'; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

By स्नेहा मोरे | Published: July 29, 2023 07:45 PM2023-07-29T19:45:00+5:302023-07-29T19:45:59+5:30

शहराकडे येण्याचा ओढा कमी होईल!

employment opportunities in villages due to satellite campuses said mangal prabhat lodha | 'सॅटेलाईट कॅम्पसमुळे गावात रोजगाराची संधी'; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

'सॅटेलाईट कॅम्पसमुळे गावात रोजगाराची संधी'; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यास महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे मदत होईल. राज्यात अनेक ठिकाणी सॅटेलाईट कॅम्पसची स्थापना केल्याने युवकांचा मोठ्या शहरांकडे येण्याचा ओढा कमी होईल. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजास शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यासाठी विविध अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याची निवड प्रक्रिया १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. विद्यापीठामार्फत १८ नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती अगदी अल्प कालावधीत केली आहे. विद्यापीठातील सगळे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन असून यात श्रेणी, कौशल्याधारित कोर्सेस, ऑन जॉब ट्रेनिंग याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ४० टक्के अभ्यासक्रम वर्गात आणि ६० टक्के अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंगच्या स्वरुपात शिकविण्याची संकल्पना आहे, असे लोढा यांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठाने ॲकेडमिक बँक ऑफ क्रेडिटसला नोंदणी केली आहे. प्राध्यापकांची निवड केली आहे. विद्यापीठ हे पहिल्या वर्षापासून तंत्र विज्ञानाला जोड देऊन डिजिटल विद्यापीठ करण्याचा मानस आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने स्वतःची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (एलएमएल) सुरू केली आहे. त्याचबरोबर क्लाऊड लॅबस् आणि डाटा सेंटरची सुद्धा स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेल मुख्य संकुल

अपस्किलिंग आणि फिनिशर्स प्लॅटफॉर्मची संकल्पना महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी विविध २० कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून उपकेंद्र मुंबई, नवी मुंबई, पुणे, लोणावळा व औरंगाबाद येथे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे, मुलुंड येथे पुढच्या शैक्षणिक वर्षात उपकेंद्र सुरू करण्याचा मानस आहे. विद्यापीठाचे मुख्य संकुल हे पनवेल येथे प्रस्तावित आहे. विद्यापीठाचे यावर्षीचे अभ्यासक्रम नवी मुंबई, खारघर येथे आणि पुणे, औंध येथे सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठाकडून अपस्किलिंग आणि फिनिशर्स प्लॅटफॉर्मची संकल्पना राबविली जात आहे.

Web Title: employment opportunities in villages due to satellite campuses said mangal prabhat lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.