धान्य व्यापारातून महिलांना रोजगार

By admin | Published: March 8, 2016 02:17 AM2016-03-08T02:17:56+5:302016-03-08T02:17:56+5:30

विशिका हरेंद्र (वडिलांचे नाव) यांनी कधी विचारही केला नसेल की, त्यांचा स्वयंपाकाचा छंद त्यांना आघाडीची अन्नधान्य, फळ, भाजीपाला व्यापारी बनवेल. आज वयाच्या ३१व्या वर्षी त्यांनी नवी मुंबईसारख्या

Employment from women in grain trade | धान्य व्यापारातून महिलांना रोजगार

धान्य व्यापारातून महिलांना रोजगार

Next

अंजली भुजबळ,  मुंबई
विशिका हरेंद्र (वडिलांचे नाव) यांनी कधी विचारही केला नसेल की, त्यांचा स्वयंपाकाचा छंद त्यांना आघाडीची अन्नधान्य, फळ, भाजीपाला व्यापारी बनवेल. आज वयाच्या ३१व्या वर्षी त्यांनी नवी मुंबईसारख्या देशातील आघाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी म्हणून गगनभरारी घेतली आहे. त्यांच्या व्यापाराचा पसारा परदेशातही पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे, विशिका यांच्याकडे आज ७५० महिला कामगार आहेत.
एमबीए, सायबर लॉ केल्यानंतर विशिका एका को-आॅपरेटिव्ह बँकेत नोकरी करत होत्या. काही काळ त्यांनी मुंबई, नागपूर येथे कुकिंग क्लासदेखील घेतले. आपले अन्न अधिक चविष्ट करण्याच्या प्रयत्नात, ताज्या भाज्या आणि फळांसाठी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. बाजारात येणारा माल चार ते पाच दिवस शिळा असतो, हे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांकडे पाच रु पये किलोने मिळणारी मिरची बाजारात १५ रु पयांना का मिळते, याचेही कारण समजले. अडत, दलाली, तोलाई (माल मोजण्याचे पैसे) या माध्यमातून बाजार समितीत होणारी शेतकऱ्यांची लूट टाळण्याच्या हेतूने विशिका ट्रेडिंगच्या व्यवसायात उतरल्या.
इमेन्स एन्कॉर्पोरेशनची २०१३ मध्ये स्थापना करून, अवघ्या १०० रु पयांपासून विशिका हरेंद्र यांनी व्यवसाय सुरू केला. खेड्या-पाड्यांत एसटीने प्रवास केला. प्रसंगी १०-२० किमीचा पायी प्रवास करत शेतावर पोहोचल्या. मुंबई बाजार समितीत पुरुष व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती. स्पर्धेने खचून न जाता त्या व्यवसाय वाढवण्याच्या निर्धाराने पुढे जात राहिल्या. आज त्यांची उलाढाल १८ कोटींच्या घरात आहे. त्या सिंगापूर, मलेशिया, दुबई येथेही माल पाठवतात. दिवसातून ३० ते ३५ टन भाज्यांची खरेदी-विक्री करतात. दररोज कांद्याने भरलेले ५-६ कंटेनर त्यांच्याकडून जातात. याशिवाय संत्री, मिरची, मोसंबी, डाळिंबांचीही खरेदी-विक्री त्या करतात. थेट शेतकऱ्यांकडून उचललेला माल त्या पाठवत असल्याने आणि इतरांपेक्षा चांगला भाव त्या शेतमालाला देत असल्याने शेतकरीही समाधानी आहेत.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दक्षिण भारत आणि गुजरातमधील २,७०० शेतकरी त्यांनी जोडले आहेत. लवकरच आपण फूड बिझनेसमध्येही उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Employment from women in grain trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.