उपजिल्हाधिकाऱ्यांची रिक्त १०० पदे तहसीलदारांमधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 04:21 AM2019-03-07T04:21:35+5:302019-03-07T04:21:38+5:30

राज्यात तहसीलदारांमधून पदोन्नतीने भरावयाची उपजिल्हा-धिकाऱ्यांची १०० पदे लवकरच भरण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

Empty 100 posts of sub-district officials from Tehsildars | उपजिल्हाधिकाऱ्यांची रिक्त १०० पदे तहसीलदारांमधून

उपजिल्हाधिकाऱ्यांची रिक्त १०० पदे तहसीलदारांमधून

Next

मुंबई : राज्यात तहसीलदारांमधून पदोन्नतीने भरावयाची उपजिल्हा-धिकाऱ्यांची १०० पदे लवकरच भरण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.
या रिक्त पदांसाठीची ज्येष्ठता यादी येत्या १५ दिवसांत तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती करण्याची प्रक्रिया साधारणत: मे अखेर राबविली जाईल. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाºयाचा दर्जा असला तरी त्यांना ती वेतनश्रेणी दिली जात नाही. ते देण्याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कोतवालांच्या प्रतिनिधींचीही बैठक घेतली. वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या कोतवालांना शिपाईपदाचे वेतन (१५ हजार रुपये) देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महिला कोतवालांना सहा महिने मातृत्व रजा, कोतवालांमधून तलाठी पदावर नेमणूक देण्यासाठी कोटा निश्चिती, तसेच नेहमीच्या परीक्षेऐवजी वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे.

Web Title: Empty 100 posts of sub-district officials from Tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.