'महापालिकेच्या कामगार भरतीतील रिक्त पदे गुणवत्तेनुसार भरावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 02:08 AM2019-06-16T02:08:50+5:302019-06-16T02:09:07+5:30

दलित युथ पँथरची मागणी

'Empty vacancies in the recruitment of BMC for municipal corporation' | 'महापालिकेच्या कामगार भरतीतील रिक्त पदे गुणवत्तेनुसार भरावी'

'महापालिकेच्या कामगार भरतीतील रिक्त पदे गुणवत्तेनुसार भरावी'

Next

मुंबई : मुंबई महापालिकेने २०१७ -१८ मध्ये १३८८ कामगार पदासाठी भरती घेतली होती़ त्या भरतीमधील बहुतांश पदे रिक्त असून रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार भरती करण्यात यावी, अशी मागणी दलित युथ पँथरने पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी दलित युथ पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाईसाहेब जाधव , मुख्य सचिव निलेश मोहिते, परिक्षार्थी पूनम घोलप आदी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेने जी भरती घेतली होती ,त्या भरतीतील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादी प्रमाणे पुढील उमेदवारांची निवड करणे अपेक्षित होते. समांतर आरक्षणांतर्गत राखीव असलेल्या पदांकरिता पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास ही पदे त्याच सामायिक प्रवगार्तून समांतर आरक्षण विरहित म्हणून करण्यात येतील.

निवड झालेले उमेदवार काही कारणास्तव अपात्र करणे,संपर्क न साधणे इ कारणास्तव रिक्त राहिलेली पदे गुणवत्ता यादीनुसार भरण्याचे पालिकेच्या जाहिरातीत नमूद केले आहे़ प्रशासनाने भरती स्थगित करून उमेदवारांवर अन्याय केला आहे.याबाबत पाठपुरावा करून त्याची दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ १८ जून रोजी आझाद मैदानात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दलित युथ पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी दिली.

यासोबतच नवीन डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर कफ परेड कुलाबा येथील झोपडपट्ट्यांतील नागरिकांकडे १५ ते २० वर्षांचे पुरावे असताना खाजगी विकासक अनधिकृतपणे कारवाई करत आहे. त्याना संरक्षण द्यावे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व जामऋषी नगर मालाड (पु) येथील रहिवाशाना पाणी,शौचालय ,सांडपाणी व्यवस्थापन ,वीज अशा मूलभूत सेवा मिळत नाही . सदर जागा वनखात्याची असून या समस्यांकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत, या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात याव्यात अशी मागणी निलेश मोहिते यांनी यावेळी केली. ही मागणी पूर्ण करणार की नाही, हे आता बघावे लागणार आहे़ कारण याआधीही अशाप्रकारची मागणी दुसऱ्या एका प्रकरणात करण्यात आली होती़ मात्र त्याची पूर्तता होऊ शकली नाही़

ज्या प्रवगार्तील उमेदवार नसतील ते गुणवत्ता यादीनुसार भरण्यात येतील असे पालिकेने म्हटले होते. एससी प्रवगार्ची यादी ७७ मार्कांवर बंद झाली. काही पदे रिक्त असून या प्रवगार्तील मलाही ७७ मार्क असून नोकरी मिळायला हवी.
- पूनम घोलप, परिक्षार्थी

Web Title: 'Empty vacancies in the recruitment of BMC for municipal corporation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.