मुंबई : तीव्र सांधेदुखीसह मणक्याच्या दुखण्यावर अनेक औषधोपचार करूनही त्यात सुधारणा न होता त्याचा त्रास बळावतो. संधिवात आणि स्पॉण्डिलायटिसपेक्षा तीव्र वेदना होणाऱ्या आजाराला ‘अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ (एएस) असे म्हणतात. या आजारावर औषधाबरोबरच योग साधना, व्यायाम, डाएट आणि सकारात्मक दृष्टिकोन हे उपाय असल्याचे जगदीश ब्रामटा यांनी सांगितले.संधिवात अथवा स्पॉण्डिलायटिस हे आजार सर्वश्रुत आहेत. पण, त्याहून तीव्र वेदना होणाऱ्या ‘अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ला ‘बांबू बॅक’ असेही संबोधतात. कारण, या आजारात मणका, सांधे घट्ट होतात. प्रत्येक व्यक्तीनुसार या आजाराचे स्वरूप बदलते. अॅलोपॅथीमध्ये या आजारासाठी विशिष्ट औषध नाही. पण, औषधांबरोबरच हा आजार सुसह्य करून सामान्य आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर योग साधना, प्राणायाम, डाएटची योग्य सांगड असणे आवश्यक आहे. ‘अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ग्रस्तांना हे उपाय आणि आयुर्वेदानुसार एएस म्हणजे काय? हे आता एक दिवसीय शिबिरात शिकविले जाणार असल्याची माहिती ब्रामटा यांनी दिली. ब्रामटा यांनी सांगितले, या आजारात होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे व्यक्तीला हालचाल करणेही शक्य होत नाही. वेदना कमी होत नसल्यामुळे त्या व्यक्तींना काय करावे, हेही सुचत नाही. हा आजार फक्त मणक्यालाच होतो असे नाही, तर मान, कंबर, हाताचे सांधे, गुडघ्यांनाही होतो. प्रत्येक व्यक्तीनुसार या आजाराचे स्वरूप आणि तीव्रता बदलत जाते. पण, सकारात्मक विचार केल्याने आणि परिपूर्ण दृष्टिकोनामुळे आजार सुसह्य होतो. त्याचबरोबर आजारासह ती व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकते. यासाठी अॅलोपॅथीचे औषध घेणे आवश्यक आहे. पण, त्याबरोबर अन्य उपायही आवश्यक असतात. प्रत्येक व्यक्तीला तपासून त्यांच्या आजाराप्रमाणे त्यांना हे उपाय शिबिरात दिले जातात. या एक दिवसीय शिबिरात सहभागी होण्यासाठी ९३२२२९५२२२ या क्रमांकावर जगदीश ब्रामटा यांच्याशी संपर्क साधावा. ँङ्म’्र२३्रूंस्रस्र१ङ्मंूँ.ं२@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेलवर अथवा #ऌङ्म’्र२३्रूअस्रस्र१ङ्मंूँळङ्मअर या फेसबुक पेजवर शिबिराविषयी अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. लवकरच या शिबिराची तारीख जाहीर होणार असून, मुंबईत हे शिबिर होणार आहे. याआधी अशाप्रकारे दोन शिबिरे मुंबईत झाली आहेत. (प्रतिनिधी)‘अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ म्हणजे काय?अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस हा संधिवाताचा एक प्रकार आहे. या आजाराचे निश्चित कारण अजूनही उलगडलेले नाही. अनुवंशिकतेमुळे हा आजार होऊ शकतो. या आजारात मणका, हिप आणि अन्य सांध्याच्या जोडण्यांना त्रास होतो. या आजारात व्यक्तीला संधिवात आणि स्पॉण्डिलायटिसपेक्षा अधिक वेदना होतात. व्यक्तीला हालचाल करणे अशक्य होते. २० दशलक्ष ‘अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ग्रस्त जगभरात २० दशलक्ष व्यक्ती ‘अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ने ग्रस्त आहेत. या आजाराविषयी म्हणावी तितकी जनजागृती झालेली नसून या आजारासाठी विशिष्ट औषध नाही. हा आजार महिलांपेक्षा पुरुषांना होण्याचे प्रमाण अधिक आहे.
सकारात्मक दृष्टिकोनातून ‘अॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ करा सुसह्य - जगदीश ब्रामटा
By admin | Published: February 07, 2016 2:47 AM