विद्यार्थ्यांच्या लेखनकलेला मिळणार प्रोत्साहन
By Admin | Published: December 26, 2016 04:55 AM2016-12-26T04:55:35+5:302016-12-26T04:55:35+5:30
तरुणांनी विविध विषयांवर लिहावे, त्यांच्यातल्या लेखनाला प्रोत्साहन मिळावे, त्यांचे विचार लेखणीतून व्यक्त व्हावेत, यासाठी
मुंबई : तरुणांनी विविध विषयांवर लिहावे, त्यांच्यातल्या लेखनाला प्रोत्साहन मिळावे, त्यांचे विचार लेखणीतून व्यक्त व्हावेत, यासाठी महाविद्यालयात नियतकालिके काढली जातात. ही नियतकालिके महाविद्यालयापुरती मर्यादित राहतात, पण राज्यातील विविध महाविद्यालयांतील नियतकालिकांना एकाच व्यासपीठावर आणून, त्यांचे जतन करण्याचा उपक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.
राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेसाठी नियतकालिक पाठवण्याची मुदत २ जानेवारीपर्यंत आहे.
स्पर्धेसाठी महाविद्यालयांनी नियतकालिकाची प्रत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई - ४०००२१ या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन केले आहे. नियतकालिकांच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये आहे. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. (प्रतिनिधी)