सिडकोच्या मार्केटमध्ये अतिक्रमण

By admin | Published: July 28, 2014 12:36 AM2014-07-28T00:36:36+5:302014-07-28T00:36:36+5:30

सिडकोने लाखो रुपये खर्च करून खारघरमध्ये उभारलेल्या मार्केटचा वापर कोंबड्यांच्या खुराड्यासाठी व प्रसाधनगृहाप्रमाणे केला जात आहे

Encroachment in CIDCO market | सिडकोच्या मार्केटमध्ये अतिक्रमण

सिडकोच्या मार्केटमध्ये अतिक्रमण

Next

नवी मुंबई : सिडकोने लाखो रुपये खर्च करून खारघरमध्ये उभारलेल्या मार्केटचा वापर कोंबड्यांच्या खुराड्यासाठी व प्रसाधनगृहाप्रमाणे केला जात आहे. मार्केटचा दुरुपयोग सुरू असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडकोने सेक्टर १२ एफ टाइप वसाहतीला लागून नाल्याच्या कडेला हे मार्केट उभारले आहे. या ठिकाणी चिकन विक्रेते कोंबड्या ठेवत आहेत. तर काहीजण जागेचा वापर पार्किंगसाठी,मुतारीसाठी करीत आहेत. सिडकोने सेक्टर १९ मध्ये बांधकाम केलेली भाजी मंडई धूळखात पडली आहे. तर स्पॅगेटी वसाहतीला लागून सिडकोने काही दुकान गाळे उभारले आहेत. परंतु त्याची विक्र ी केली नाही.धूळखात पडलेल्या गाळ्यांचा वापर काहीजण गोदाम म्हणून करीत आहेत. सेक्टर १९ ची मंडई काहीजणांनी परस्पर भाजी विक्र ेत्यांना भाड्याने देण्याची तयारी सुरु केल्याचे समजते.वसाहतीमध्ये एकही नियोजित मंडई नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.विक्र ेत्यांनी पदपथ व रस्ते अडवून व्यवसाय सुरू केला असून त्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसत आहे.
सिडकोचे नियोजन नसल्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या प्रत्येक विभागातील जागेवर फेरीवाल्यांनी अतिक्र मण केले आहे. सद्यस्थितीमध्ये सेक्टर अकरा, बारा, सात, पाच, एकवीस, पंधरा, दोन , आठमध्ये, ३४, ३५ मध्ये भाजीविक्रेते व इतर फेरीवाल्यांकडून व्यवसायासाठी पदपथ अडविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Encroachment in CIDCO market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.