भररस्त्यात स्टॉलधारकांचे अतिक्रमण, महापालिकेची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:42 AM2021-02-01T02:42:58+5:302021-02-01T02:43:16+5:30

Mumbai News : गोरेगाव (पुर्व) येथे तेरा वर्षापूर्वी इमारत कोसळल्यानंतर मोकळ्य़ा झालेल्या जागेतील स्टॉलधारकांच्या अतिक्रमणाकडे महापालिका डोळेझाक करीत असल्याने येथील रहिवाशी संतप्त झाले आहेत.

Encroachment of stall holders throughout | भररस्त्यात स्टॉलधारकांचे अतिक्रमण, महापालिकेची डोळेझाक

भररस्त्यात स्टॉलधारकांचे अतिक्रमण, महापालिकेची डोळेझाक

Next

मुंबई : गोरेगाव (पुर्व) येथे तेरा वर्षापूर्वी इमारत कोसळल्यानंतर मोकळ्य़ा झालेल्या जागेतील स्टॉलधारकांच्या अतिक्रमणाकडे महापालिका डोळेझाक करीत असल्याने येथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले  आहे.

 आरे रोडवरील राम निवास चौथे बिल्डिंग सप्टेंबर २००८ मध्ये पत्यांच्या बंगल्याप्रमाणो कोसळल्यानंतर ही इमारत बांधून देण्यात यावी यासाठी या इमारतीतील रहिवाशी बिल्डरकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र दरम्यानच्या काळात ही इमारत कोसळल्याने रिकाम्या झालेल्या जागेचा चायनीज स्टॉलसह अनेक फेरीवाल्यांनी ताबा घेतल्याने रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या जागेवर इमारत बांधून घेण्यास अडचणी येत आहेत. भररस्त्यात खाद्यपदार्थ विकणा:या या स्टॉलधारकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अपघात होण्याची भीती रहिवाशांना भेडसावत आहे. या स्टॉलधारकांनी अनधिकृतरीत्या वीजकनेक्शनही मिळवले असून समाजकंटकांचा त्यांना वरदहस्त असल्याने विरोध करण्यासही रहिवाशी घाबरत आहेत. या त्रसामुळे माजी खासदार हुसेन दलवाई यांनीही याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. 

 कोसळलेल्या इमारतीतील गाळेधारक अब्दुल सत्तार इसा भाला यांच्याकडे २००२ सालापासूनची महापालिकेच्या पाहणी अहवालासह अन्य कागदपत्रे असून त्यांच्या जागेवरही अतिक्रमण करण्यात आले आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत महापालिका आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली. 

 

Web Title: Encroachment of stall holders throughout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई