देशातील पहिल्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमण; कपाटं, बेड मांडून थाटले जाताहेत संसार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:36 PM2021-10-28T13:36:51+5:302021-10-28T13:36:58+5:30
केम्प्स कॉर्नर या फ्लायओव्हरची ओळख देशातील सर्वात पहिला उड्डाणपूण अशी आहे. अतिक्रमण केव्हा हटवला जाणार असा स्थानिकांकडून प्रश्न.
केम्प्स कॉर्नर या फ्लायओव्हरची ओळख देशातील सर्वात पहिला उड्डाणपूण अशी आहे. मरीन ड्राईव्हजवळच असलेल्या या ब्रिजखाली काही जणांनी संसार थाटल्याचं पाहायला मिळतंय. या अतिक्रमणाची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होतेय.
केम्प्स कॉर्नर या फ्लायोव्हरखाली सुमारे २५ जण अनधिकृतरित्या वास्तव्य करत आहेत. इतकंच नाही तर बेड्स, कपाटं असं सर्व सामानदेखील त्यांनी या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. उच्चभ्रू वस्ती आणि काही महत्त्वाची कार्यालयं या भागात आहेत. अनेक राजकीय नेते, उद्योगपती या मार्गावरून रोज प्रवास करतात. या अतिक्रमणाचा स्थानिक रहिवाशांनाही त्रास होत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण आत्ता नाही तर कधी हटवणार, असा प्रश्न विचारला जातोय. या संदर्भातील व्हिडीओ 'लोकमत'चे जॉईंट एमडी आणि एडिटोरिअल डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी ट्विट केला आहे.
It's unfortunate that this #encroachment has happened under the Kemps Corner flyover. There are beds, cupboards, etc. with nearly 25 people staying here. Every politician, bureaucrat, and industrialist uses this road. I hope this gets cleared. #Mumbai@mybmc@MumbaiPolicepic.twitter.com/GAhhy9xLPD
— Rishi Darda (@rishidarda) October 26, 2021
मुंबईत अनेक ठिकाणी अतिक्रमणाचे प्रकार घडल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कलिना या संकुलातही कुलगुरूंच्या बंगल्यामागील अडीच एकर जागेतील झालेल्या अतिक्रमणावरून विद्यापीठाच्या सीनेटमध्ये तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबईत रेल्वे ट्रॅकच्या शेजारील जागा असो किंवा फुटपाथ, अशा अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.