केम्प्स कॉर्नर या फ्लायओव्हरची ओळख देशातील सर्वात पहिला उड्डाणपूण अशी आहे. मरीन ड्राईव्हजवळच असलेल्या या ब्रिजखाली काही जणांनी संसार थाटल्याचं पाहायला मिळतंय. या अतिक्रमणाची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होतेय.
केम्प्स कॉर्नर या फ्लायोव्हरखाली सुमारे २५ जण अनधिकृतरित्या वास्तव्य करत आहेत. इतकंच नाही तर बेड्स, कपाटं असं सर्व सामानदेखील त्यांनी या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. उच्चभ्रू वस्ती आणि काही महत्त्वाची कार्यालयं या भागात आहेत. अनेक राजकीय नेते, उद्योगपती या मार्गावरून रोज प्रवास करतात. या अतिक्रमणाचा स्थानिक रहिवाशांनाही त्रास होत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण आत्ता नाही तर कधी हटवणार, असा प्रश्न विचारला जातोय. या संदर्भातील व्हिडीओ 'लोकमत'चे जॉईंट एमडी आणि एडिटोरिअल डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी ट्विट केला आहे.