वनविभागाच्या जागेत अतिक्रमणो

By admin | Published: December 6, 2014 10:19 PM2014-12-06T22:19:10+5:302014-12-06T22:19:10+5:30

शिरगाव-सातपाटी दरम्यानच्या समुद्रकिना:यालगत वनविभागाच्या जागेमध्ये वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा अतिक्रमणो वाढू लागली आहेत.

Encroachments in the forest area | वनविभागाच्या जागेत अतिक्रमणो

वनविभागाच्या जागेत अतिक्रमणो

Next
हितेन नाईक ल्ल पालघर
शिरगाव-सातपाटी दरम्यानच्या समुद्रकिना:यालगत वनविभागाच्या जागेमध्ये वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा अतिक्रमणो वाढू लागली आहेत. काही लोकांनी या जागेवर अतिक्रमण करीत कुंपण उभारल्याने वनविभागाच्या पर्यटनाचा प्रस्तावाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.
शिरगाव-सातपाटी दरम्यान पश्चिमेकडे समुद्रकिना:यालगत सर्वे नं. 288 मध्ये 21 हेक्टर जागा असून 3क्-35 वर्षापूर्वी या जागेवर लावलेल्या सुरूच्या वनराईमुळे किना:याची धूप थांबून पर्यटकांनी या भागाला मोठी पसंती दिली होती. मात्र, याच झाडांची वाढ जास्त झाल्याचे कारण देत वनविभागाने सर्व झाडे कापली होती. त्यामुळे हा अत्यंत सुंदर भाग बोडका झाला होता. परिणामी, पुन्हा किना:याची धूप वाढू लागली असून मागील 25 वर्षापासून या ओसाड जागेवर पुन्हा वृक्षारोपण केलेले नाही. या वनविभागाच्या उदासीन धोरण व काही लोकांनी वनविभागाच्या अधिका:यांशी छुपी हातमिळवणी करून त्यांच्या जागांवर अतिक्रमणो केली आहेत. या अतिक्रमाणांवर वेळीच कारवाई होत नसल्यामुळे शिरगावमध्ये काही बागायतदारांनी वनविभागाचे क्षेत्र बळकाविण्याचा सपाटा लावला आहे. यावर वनविभागाकडून 2-3 वर्षापूर्वी  थातूरमातूर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर वनविभागाने लावलेला बोर्डही काढून फेकून देण्यात आला असून अनेक लोकांनी कुंपण घालून जागांवर आपला हक्क बजावण्यास सुरूवात केली आहे. तर काही लोकांनी सर्रास सीआरझेडच्या कायद्याचा भंग करीत मोठमोठी बांधकामे केली आहेत.
 
4वनविभागाने आपल्या या जागेवर इको-टुरिझमच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी, यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला असून 21 हेक्टर क्षेत्रपैकी 15 हेक्टर जागांवर सुरूच्या झाडांची लागवड करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळावा, याची मागणी केल्याचे वनविभागाचे दिघे यांनी लोकमतला सांगितले. 
 
4पालघरचे सहायक वनसंरक्षक एन.एन. कुप्ते यांच्याशी संपर्क साधला असता अशा अतिक्रमणावर कारवाई करण्यासंदर्भात मी माङया कर्मचा:यांना पाहणीसाठी पाठवितो व लवकरच कारवाईचा बडगा उचलतो, असे सांगितले.

 

Web Title: Encroachments in the forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.