२०२० चा शेवटही कडू; मुंबई अत्यंत प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:04 AM2021-01-01T04:04:47+5:302021-01-01T04:04:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईतल्या प्रदूषणाचा स्तर पुन्हा वाढू लागला आहे. २०२० हे वर्ष सरत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईतल्या प्रदूषणाचा स्तर पुन्हा वाढू लागला आहे. २०२० हे वर्ष सरत असतानाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर २०२० रोजीही मुंबईची हवा अत्यंत प्रदूषित नोंदविण्यात आली. हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या सफर या संकेतस्थळावर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा ढासळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईच्या हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण ३०७ पार्टीक्युलेट मॅटर एवढे नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल बीकेसी, चेंबूर, अंधेरी, नवी मुंबई, मालाड, माझगाव येथील हवादेखील प्रदूषित नोंदविण्यात आली.
* परिसर आणि प्रदूषित घटकांचे प्रमाण (पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)
मुंबई ३०७ (अत्यंत प्रदूषित)
बीकेसी ३६३ (अत्यंत प्रदूषित)
चेंबूर ३१२ (अत्यंत प्रदूषित)
अंधेरी ३०५ (अत्यंत प्रदूषित)
नवी मुंबई ३४९ (अत्यंत प्रदूषित)
मालाड ३२१ (अत्यंत प्रदूषित)
माझगाव ३४२ (अत्यंत प्रदूषित)
---------------