पालघरातील ३६ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका २२ एप्रिलला

By admin | Published: April 2, 2015 11:02 PM2015-04-02T23:02:38+5:302015-04-02T23:02:38+5:30

पालघर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका येत्या २२ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आल्या असून लगेच दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी

By the end of April, the 36th phase of the Palghar will be held on April 22 | पालघरातील ३६ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका २२ एप्रिलला

पालघरातील ३६ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका २२ एप्रिलला

Next

पालघर : पालघर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका येत्या २२ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आल्या असून लगेच दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसिलदार सचिन चौधरी यांनी दिली.
पालघर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जमातीच्या महिलाच्या ४२ जागासाठी तर अनुसूचित जमातीच्या ८ जागा, सर्वसाधारण महिला ३ जागा, सर्वसाधारणसाठी ३ जागा, नागरीकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी ८ जागा तसेच नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी ४ जागा अशा एकुण ६८ जागासाठी ही पोटनिवडणुक होत आहे. तालुक्यातील नवी देलवाडी ९ जागा, वेंगणी २ जागा, पथराळी १, गांजा ढेकाळे १, खैरगु्रप २, दारशेत २, सागावे २, सफाळे १, शेलवली १, दातिवरे १, किराट २, नागझरी १, बेटेगाव १, महागाव ३, गुंदळे १, अक्करपट्टी १, घिवली २, उच्छेळी १, बिरवाडी १, पडघे २, रावते ३, चिंचारे १, एडवण १, डोंगरे २, लालठाणे १, खडकोली २, लोवरे १, काटाळे १, पोळ १, कोसबाड १, नवीन दापचरी १, नांदगाव तर्फे तारापूर ३, नावझे २, जायशेत २, बऱ्हाणपूर १, खानिवडे २, गारगाव २, अशा एकूण ३६ ग्रामपंचायतीच्या ६८ जागासाठी निवडणुका होणार
आहेत.
निवडणुकाचे अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ मार्च ते ७ एप्रिल असून सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. ८ एप्रिलला अर्जाची छाननी असून १० एप्रिलला अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत राहणार आहे. तर त्याच दिवशी निवडणूक, चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. २२ एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून २३ एप्रिल रोजी सकाळी मतमोजणी करून तात्काळ निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: By the end of April, the 36th phase of the Palghar will be held on April 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.