Join us

महाराष्ट्रातील लॉकडाऊन समाप्त करा, खासदाराची व्हिडिओतून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 7:49 PM

राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या अधिवेशनला त्यांनी शुभेच्छा देतांना त्यांनी बोरिवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्याशी बातचीत करत सदर मागणी केली.

ठळक मुद्देराज्य सरकारच्या दोन दिवसांच्या अधिवेशनला त्यांनी शुभेच्छा देतांना त्यांनी बोरिवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्याशी बातचीत करत सदर मागणी केली.

मुंबई - कोरोना चाचण्या वाढल्या असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारच्या नियमांच्या आधारे आता महाराष्ट्रातील लॉकडाऊन समाप्त करा अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्य सरकारला केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी केला आहे. आपण सरकारवर टीका करत नसून सरकारी नियमांचे पालन करून आपण सर्व मिळून कोरोनाचा यशस्वी मुकाबला करू आणि राज्याच्या विकासात आपले योगदान देऊन महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगती पथावर आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या अधिवेशनला त्यांनी शुभेच्छा देतांना त्यांनी बोरिवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्याशी बातचीत करत सदर मागणी केली. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता ही आता कोरोना बाबत जागृत असून,आता कोरोनाबाबत काळजी व उपाययोजना उपलब्ध असून त्याचा अवलंब नागरिक करत आहेत. देशासह जगातून  कोरोना पूर्णपणे संपणार नाही. गेली 5 महिने लॉकडाऊन मुळे नागरिक आज घरी बसले असून निराश झाले आहेत. राज्यातील नागरिकांच्या हाताला काम हवे आहे.सरकारने राज्यातील नागरिकांचे आत्मबल वाढवले पाहिजे, किती दिवस तुम्ही त्यांचे पाय अखडून ठेवणार असा सवाल खासदार शेट्टी यांनी  केला.

टॅग्स :मुंबईखासदारकोरोना वायरस बातम्या