मे महिन्याच्या अखेरीस भायखळ्याच्या राणीबागेत सिंह, कोल्हा, अस्वल येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:31 AM2019-05-09T06:31:43+5:302019-05-09T06:32:01+5:30
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये नव्या पाहुण्यांची लगबग सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मंगळुरू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्यांची जोडी राणीच्या बागेत दाखल झाली.
मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये नव्या पाहुण्यांची लगबग सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मंगळुरू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्यांची जोडी राणीच्या बागेत दाखल झाली. आता, मे महिन्याच्या अखेरीस सुरत प्राणिसंग्रहालयातून सिंहाची व कोल्ह्यांची जोडी आणि देशी अस्वल मादी दाखल होणार आहे. याशिवाय नर अस्वल जून महिन्यात येणार आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या ‘आधुनिकीकरण प्रकल्पा’साठी १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १७ पिंजऱ्यांचे काम सुरू असून, त्यातील तीन पिंजºयाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच पहिल्यांदा बिबट्या आणि कोल्ह्याचे आगमन झाले आहे. हे प्राणी एक ते दीड महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात येतील.
पिलीकुल्ला प्राणिसंग्रहालयाला राणीच्या बागेने एक जोडी पहाडी पोपट, एक जोडी आफ्रिकन करडा पोपट आणि दोन रंगीत ढोक दिला आहे. त्या बदल्यात १ जोडी मोर, कोल्ह्यांची जोडी आणि बिबट्यांची जोडी राणी बागेला मिळाली आहे.
सध्या सिंहाच्या पिंजºयाचे काम सुरू असून, गुजरातमधील गीर अभयारण्य पट्ट्यातील गावातल्या झोपड्यांचे स्वरूप देण्यात आले आहे. पर्यटकांना सिंह पाहण्यासाठी व्ही विंग शेल्टर तयार करण्यात आले आहे. सिंहाच्या पिंजºयामध्ये बांबूची झाडे, गवत, दगड, बसण्यासाठी आसने, धबधबा इत्यादी गोष्टींचा समावेश असेल, अशी माहिती अधिकाºयाने दिली. या प्राण्यांमुळे मुलांना राणीच्या बागेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रस्ताव सादर
आशियाई सिंहाची जोडीही लवकरच आणली जाणार आहे. सिंहाची जोडी आणण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय (नवी दिल्ली) यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली.