आधुनिक रावणांचा करा अंत - दा.कृ.सोमण
By admin | Published: October 11, 2016 03:13 AM2016-10-11T03:13:03+5:302016-10-11T03:13:03+5:30
विजयादशमीच्या दिवशी केवळ रावणाचे पुतळे जाळून काहीही फायदा होणार नाही. प्रत्येकाने स्वत:च राम बनून स्वत:मध्ये लपलेल्या आळस
मुंबई : विजयादशमीच्या दिवशी केवळ रावणाचे पुतळे जाळून काहीही फायदा होणार नाही. प्रत्येकाने स्वत:च राम बनून स्वत:मध्ये लपलेल्या आळस, अज्ञान, अंधश्रद्धा, अनीती, भ्रष्टाचार, व्यसन अशा रावणांचा अंत केला पाहिजे, स्वत:ला मुक्त करायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ पंचागकर्ते दा. कृ.सोमण यांनी केले आहे.
विजयादशमीचे महती सांगताना सोमण यांनी सांगितले की, एकदा महिषासूर राक्षसाने पृथ्वीवरील सर्व लोकांना त्रास देऊन भंडावून सोडले. त्यावेळी परमेश्वराने अष्टभुजा देवीच्या रूपाने त्या राक्षसाशी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आश्विन शुक्ल दशमीपर्यंत तुंबळ युद्ध करून, त्यास ठार मारून विजय मिळवला. त्यावेळी देवीने ‘विजया’ नाव धारण केले म्हणून ‘विजयादशमी’ असे म्हणतात. प्रभू रामचंद्राने याच दिवशी रावणाचा वध केला. आता आपल्यालाच समाजातील भ्रष्टाचार, अनीती , गुंडगिरी इत्यादी राक्षसांविरुद्ध कायदेशीर कारवाई करायला हवी. समाजात सुख, शांतता, सहिष्णुता नांदण्यासाठी आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी.