ठळक मुद्देस्वप्नीलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमातील स्वप्नीलचा हा व्हिडिओ शेअर होत आहे.
मुंबई - मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने केलेल्या वक्तव्याचा हा व्हिडिओ असून शेवटी सत्याचाच विजय होतो, असे त्याने म्हटले होते. मात्र, हा व्हिडिओ शेअर करताना स्वप्नीलकडून एक चूक झाली. ती म्हणजे जानेवारी 2106 मधील हा व्हिडिओ असल्याचे स्वप्नीलने म्हटले होते. मात्र, जानेवारी 2106 हे वर्ष अद्याप आलेच नाही. आपली चूक लक्षात येताच स्वप्नीलने ती सुधारली. ''2106 Jan. मध्ये मी केलेलं एक आवाहन! सध्या खूप व्हायरल होतंय असं कळलं! बरं वाटल ! चांगुल पणाची, चांगलं वागण्याची, वागवण्याची गरज जेवढी आत्ता आहे, कदाचित या आधी कधीच न्हवती !, असा आशय ट्विट करत स्वप्नीलने ट्विट केलं होतं. या ट्विटसोबत त्याने चांगला वागणं कधीही सोडायचं नाही, शेवटी सत्याचाच विजय होतो,'' असे म्हटल्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. मात्र, हे ट्विट करताना स्वप्नीलकडून एक चूक झाली होती. जानेवारी 2106 असे त्याने लिहीले होते. विशेष म्हणजे अद्याप जानेवारी 2106 हे साल उजाडायचे आहे. चाहत्यांनी स्वप्नीलच्या ट्विटवर कमेंटमध्ये ही चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर, त्याने #2016 असे म्हणत आपली चूक सुधारली आहे. स्वप्नीलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमातील स्वप्नीलचा हा व्हिडिओ शेअर होत आहे. देशात, कंगना आणि रिया चक्रवर्तीचे प्रकरण गाजत आहेत, त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या समर्थकांकडून आमचाच म्हणजे सत्याचाच विजय होणार, असे दाखविण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून होत आहे.
1800 रुपयांच्या काकूवरुन स्वप्नीलने ट्रोलर्संना सुनावले
स्वप्नील जोशीने 1800 रुपयांच्या हिशोबवरुन ट्रोल झालेल्या काकूंना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्संना चांगलेच सुनावले होते. स्वप्नीलने हा व्हायरल व्हिडिओ गंभीरतेने घेतला असून ट्रोलर्संना स्वत:मध्ये पाहण्याचा सल्लाच एकप्रकारे दिला. ''त्यांचा फक्त पैशांचा हिशोब चुकलाय हो... आपल्यापैकी अनेकांचा आयुष्याचा हिशोब चुकलाय !!! मग आपण स्वतःवर किती हसलं पाहिजे!??'', असे स्वप्नीलने ट्विट करुन म्हटले होते.