Chhagan Bhujbal :'माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात'; मनोज जरांगेवर छगन भुजबळ संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:54 PM2024-06-22T12:54:53+5:302024-06-22T12:57:37+5:30
Chhagan Bhujbal : काल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
Chhagan Bhujbal ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आरक्षणावरुन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. "दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे. आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही. ओबीसी आंदोलनामगे येवलेवाले आहेत. त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे. तुम्ही आमची शाळा करणार का, राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो",अशी टीका जरांगे पाटील यांनी केली, या टीकेला आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट
"काल सगळ्यांच्यात चर्चा झाली आहे, आज त्यांनी उपोषण सोडावं म्हणून आज आम्ही त्यांची भेट घेणार आहे. ज्या, ज्या तक्रारी येतील त्याची चौकशी केली जाईल. चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा हे दोन्ही गुन्हेगार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आम्ही मराठा समाजावर अन्याय करा असं सांगत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार सोडवत आहे, विद्यार्थ्यांच्या फीचेही पाहत आहे. सरकार सगळ्यांसाठी काम करत आहे मग अडचण काय आहे, असंही छगु भुजबळ म्हणाले.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मी मंत्रिपदाचा राजिनामा दिला होता, तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलाय. माझं राजकीय करिअर संपवणं हे पार्टीच्या आणि त्याआधी जनतेच्या हातात आहे. मला घरी बसवलं तरी मी रस्स्त्यावर उतरुन ओबीसींसाठी लढत राहणार आहे, असंही भुजबळ म्हणाले.
"राजकीय करिअर उठवले नाही तर नाव बदलतो"
दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे. आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही. ओबीसी आंदोलनामगे येवलेवाले आहेत. त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे. तुम्ही आमची शाळा करणार का, राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो, मग तुम्ही किती पळता ते पाहतो, या शब्दांत मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
"आमच्या भविष्याचे वाटोळे केले. लोकांना आंदोलनाला बसवायचे जमते. वाहने पुरवली जात आहेत. गाव-खेड्यांमध्ये आम्ही एक आहोत. जे लढत आहेत, त्यांनाही कळत नाही की आपण कुणासाठी लढत आहोत. ते राजकारणी आहेत. राजकीय फायद्यासाठी हे सगळे सुरू आहे. निवडणूक झाल्यावर बघू, असे सांगत होते. आम्हीही आता निवडणूक झाल्यावर पाहतो. आम्हाला जातीय तेढ नको, म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु, तुम्ही खोटे बोलणार असाल, कुणबी नोंदी रद्द करा, अशी मागणी करणार असाल, तर मग आम्हीही बघून घेतो, मराठ्यांनो सावध व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.