...जेव्हा खड्ड्यांना टाळण्यासाठी मंत्र्यांवर लोकलमधून प्रवास करण्याची वेळ येते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 13:53 IST2018-08-30T13:50:56+5:302018-08-30T13:53:37+5:30
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला लोकल प्रवास

...जेव्हा खड्ड्यांना टाळण्यासाठी मंत्र्यांवर लोकलमधून प्रवास करण्याची वेळ येते
मुंबई: रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांसाठी काही नवी नाही. मात्र आज खड्ड्यांमुळे चक्क उर्जामंत्र्यांवर लोकलनं प्रवास करण्याची वेळ आली. ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी सीएसएमटीपासून मुलुंडपर्यंत लोकलनं प्रवास केला.
महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या लो डिस्पॅच सेंटरची पाहणी करण्यासाठी आणि आढावा बैठक घेण्यासाठी बावनकुळे सीएसएमटीहून निघाले होते. मात्र रस्त्यात असलेले खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी लोकलनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडे अकराच्या सुमारास ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी सीएसएमटी ते कळवा लोकल पकडली. बावनकुळे यांनी रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला. खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुकीसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन लोकलनं प्रवास करत असल्याचं यावेळी बावनकुळे यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला सांगितलं.