ऊर्जा क्षेत्र, कुशल मनुष्यबळामधील पोकळी भरून निघणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:06 AM2021-02-27T04:06:39+5:302021-02-27T04:06:39+5:30
मुंबई : वर्सोवा टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमधील (व्हीटीटीसी) डिप्लोमाधारकांसाठी १२ महिन्यांच्या कालावधीकरिता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) त्यांच्या नॅशनल अप्रेन्टिस ...
मुंबई : वर्सोवा टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमधील (व्हीटीटीसी) डिप्लोमाधारकांसाठी १२ महिन्यांच्या कालावधीकरिता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) त्यांच्या नॅशनल अप्रेन्टिस प्रमोशन स्किम (एनएपी) अंतर्गत अद्वितीय युनिक अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम सादर केला. हा प्रशिक्षण उपक्रम सहभागींना ऊर्जा विभागात कार्यक्षमपणे काम करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य संपादित करण्यामध्ये सक्षम ठरेल तसेच कुशल मनुष्यबळामधील पाेकळी भरून निघेल, असा त्यांना विश्वास आहे.
सदर उपक्रम ट्रिपल सर्टिफिकेशन म्हणजेच ज्युनिअर इंजिनीअर ऊर्जा वितरण, प्रशिक्षणाच्या पर्यायी व्यापाऱ्यांमधील पीएसएससीद्वारे सर्टिफिकेशन देतो. यामध्ये अधिकृत व्यक्ती म्हणून विद्युत यंत्रणेवर काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यवेक्षक परवाना मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रमुख विद्युत निरीक्षकाने सूचित केलेल्या सर्टिफिकेशन कोर्स ऑन इलेक्ट्रिकल सेफ्टी ॲण्ड डिझाइन अस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनवर १२ आठवड्यांच्या कोर्सचा अभ्यासक्रमही आहे.
..................................