Join us

जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस; नेमक्या कोणत्या प्रकरणात केली जारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 5:46 AM

चार दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू भगतसिंह पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस नेमक्या कोणत्या प्रकरणामध्ये जारी करण्यात आली आहे, याची माहिती उपलब्ध नसली तरी भगतसिंह पाटील हे मुंबईत हॉटेल व्यावसायिक आहेत. या प्रकरणी स्वतः जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, चार दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून काही माहिती मागवली आहे.

जयंत पाटील यांचीही झाली हाेती चाैकशी 

आयएल अँड एफएस कंपनीच्या प्रकरणात २२ मे रोजी जयंत पाटील यांचीदेखील ईडीने चौकशी केली होती. त्यावेळी तब्बल ९ तास त्यांची चौकशी झाली होती. तसेच, जून महिन्यांत जयंत पाटील यांच्याशी संबंधित राजारामबापू सहकारी बँकेतदेखील ईडीने छापेमारी केली होती. हे प्रकरण मूल्यवर्धित कर प्रणालीशी (व्हॅट) निगडित असून यामध्ये कथित एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची चर्चा होती.

 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयजयंत पाटील