Shiv Sena Sanjay Raut ED : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, चौकशीसाठी निवासस्थानी ED ची टीम दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 08:20 AM2022-07-31T08:20:36+5:302022-07-31T08:20:55+5:30
Shiv Sena Sanjay Raut ED : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Shiv Sena Sanjay Raut ED : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली.
कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. सध्या शोधमोहिम आणि चौकशी सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु संसदेचं अधिवेशन सुरू असल्याचं सांगत ते ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यांनी ईडीकडे मुदतवाढही मागितली होती. परंतु आज अचानक ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी दाखल झाले.
Mumbai | Enforcement Directorate officials reached Shiv Sena leader Sanjay Raut's residence around 7am today; currently conducting a search and questioning Raut, in connection with Patra Chawl land scam case pic.twitter.com/e2bfEVW3s7
— ANI (@ANI) July 31, 2022
२० जुलै रोजी संजय राऊत यांना पत्रा चाळ कथित घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्याच काळात संसदेचं अधिवेश असल्यानं त्यांनी मुदतवाढ मागितली होती. होती. त्यांच्या वकिलांकडून ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितली होती. परंतु त्यावेळी त्यांचा मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा समन्स जारी करत त्यांना २७ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.