Join us

पनामा पेपर्स प्रकरण: ईडीची मोठी कारवाई! पूनावाला यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 22:47 IST

ED Action in Panama Papers Case: पनामा पेपर प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.

ED Action in Panama Papers Case: सक्तवसुली संचालनालायने पनामा पेपर प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पनामा पेपर प्रकरणात झेड. एस. पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फेमा कायद्याच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आलेली असून, मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊस येथील तीन मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. या मालमत्तांची किंमत ४१.६४ कोटी रुपये आहे. झेड. एस. पूनावाला यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरुद्ध ईडीची चौकशी सुरु आहे. पनामा पेपर प्रकरणात ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने पनामा पेपर्स प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी झेड. एस. पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. 

नेमके प्रकरण काय?

एका जर्मन वृत्तपत्राने पनामा पेपर्स या नावाने ३ एप्रिल २०१६ मध्ये एक डेटा रिलिज केला होता. त्यामध्ये त्यांनी भारताबरोबरच दोनशे देशांमधील राजकारणी, प्रसिद्ध सेलिब्रेटी यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यात १९७७ पासून २०१५ पर्यंत वेगवेगळ्या घटना आणि आरोपांचा समावेश होता. या पेपरमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्याच्या नावाचा उल्लेख होता. 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयपनामा