अतिक्रमण हटविणाऱ्या पालिका अभियंत्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:47 AM2019-06-12T02:47:47+5:302019-06-12T02:48:12+5:30

मुख्याधापक नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरणास अडथळा ठरणारी ३४ अतिक्रमणे हटविण्याचे काम मंगळवारी सुरू झाले.

Enforcing the infiltration of the army officers | अतिक्रमण हटविणाऱ्या पालिका अभियंत्यांना मारहाण

अतिक्रमण हटविणाऱ्या पालिका अभियंत्यांना मारहाण

googlenewsNext

मुंबई : नाल्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे महापालिकेमार्फत पाडण्यात येत आहेत. मात्र जी उत्तर विभागातील मुख्याधापक नाला येथील अतिक्रमणे हटविताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी स्थानिक नागरिकांनी धक्काबुक्की व मारहाण केली़ यात जखमी दुय्यम अभियंत्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुख्याधापक नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरणास अडथळा ठरणारी ३४ अतिक्रमणे हटविण्याचे काम मंगळवारी सुरू झाले. यानुसार सायंकाळपर्यंत २० अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली असून उर्वरित बांधकामे बुधवारी हटविण्यात येणार आहेत. पोलीस संरक्षणात ही कारवाई सुरू असतानाही दुय्यम अभियंता अमित पाटील यांना मारहाण झाली. तर अभियंता रोहित आफळे व कामगार नीलेश पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर पाटील यांना महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर याबाबत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया धारावी पोलीस ठाणे येथे सुरू आहे, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या कारवाईमध्ये महापालिकेचे ९० कामगार- कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते. ८० पोलीस कर्मचारी - अधिकारी यांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता.

याआधी महापालिका अधिकाºयांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत़ पोलीस ताफा असतानाही मारहाण झाल्याने कर्मचारी व अधिकाºयांनी आश्चर्य व्यक्त केले़ दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी व अधिकाºयांनी केली आहे़ त्याचा तपास पोलीस करत असून काहींची चौकशी होणार आहे़

पात्र बांधकामाधारकांना माहुलमध्ये पर्यायी जागा
च्मुख्याध्यापक नाला पुढे जाऊन मिठी नदीला मिळतो. या नाल्याच्या रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे काम मार्गी लागल्यावर माटुंगा व धारावी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने होऊन पुराच्या संभाव्य धोक्यावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
च्या कारवाईदरम्यान तोडण्यात येणाºया ३४ अनधिकृत बांधकामांपैकी १२ बांधकामे पात्र असून त्यांना माहुल परिसरात पर्यायी सदनिका देण्यात आल्या आहेत.

Web Title: Enforcing the infiltration of the army officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.