नोकरीचे आमिष दाखवून इंजिनीअरची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:05 AM2021-04-06T04:05:17+5:302021-04-06T04:05:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून इंजिनीअरची फसवणूक केल्याप्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Engineer cheating by showing job lure | नोकरीचे आमिष दाखवून इंजिनीअरची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून इंजिनीअरची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून इंजिनीअरची फसवणूक केल्याप्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

घाटकोपरमध्ये २३ वर्षीय तक्रारदार इंजिनीयर राहतात. ते नोकरीच्या शोधात असताना ३ मार्चला त्यांना अनोळखी व्यक्तीने कॉल करून तो एअरपोर्ट अथॅारिटी ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगितले. नोकरीची आवश्यकता आहे का? याबाबत चौकशी केली. त्याने होकार देताच ग्राउंड स्टाफ मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये जाॅब असल्याचे सांगितले. परीक्षा शुल्क २१०० रुपये भरण्यास सांगितले. त्याने नोकरी मिळाल्याच्या आनंदात २१०० रुपये पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉल करून सिलेक्शन झाल्याचे सांगून सिक्युरिटी डिपाॅझिट म्हणून ८ हजार ७२३ रुपये भरण्यास भाग पाडले. पुढे अशाच प्रकारे वेगवेगळी कारणे सांगत महिनाभरात १ लाख ७४ हजार ५७८ रुपये उकळले. अशात १ एप्रिल रोजी पुन्हा आणखीन पैसे भरण्यास सांगितले. यात संशय आल्याने तरुणाने आधीचे पैसे परत देण्याचा तगादा लावला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंत नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी गुन्हा नोंदवत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

..........................

Web Title: Engineer cheating by showing job lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.