अभियांत्रिकीचे वर्ग २५ ऑक्टोबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:10+5:302021-07-14T04:09:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी तसेच विविध व्यावसायिक तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित ...

Engineering classes from October 25 | अभियांत्रिकीचे वर्ग २५ ऑक्टोबरपासून

अभियांत्रिकीचे वर्ग २५ ऑक्टोबरपासून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी तसेच विविध व्यावसायिक तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ ऑक्टोबरपासून तर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग २५ ऑक्टोबरपासून सुरू होतील. यापूर्वीच्या सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबर आणि फ्रेशर्ससाठी १५ सप्टेंबरपासून महाविद्यालय सुरू होणार होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर होत आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यांनाही आता त्यांच्या प्रवेश परीक्षा सप्टेंबर महिन्यातच पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे. कारण परिषदेने दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबरपूर्वी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरपर्यंत जाहीर करावी लागणार आहे. प्रवेश रद्द किंवा शुल्क परताव्याची अखेरची मुदत १५ ऑक्टोबर आहे. तर सर्व संस्था २० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश करणार आहेत.

-----

असे आहे वेळापत्रक

सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्ष : १ ऑक्टोबर, २०२१

पहिली प्रवेश फेरी : ३० सप्टेंबर ,२०२१

दुसरी प्रवेश फेरी :१० ऑक्टोबर ,२०२१

नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात :२५ ऑक्टोबर,२०२१

प्रवेश रद्द करण्याची मुभा : १५ ऑक्टोबर, २०२१

रिक्त जागांवर प्रवेश : २० ऑक्टोबर, २०२१

Web Title: Engineering classes from October 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.