Join us

उल्हासनगरमध्ये इंजीन फेल! नागरकोईल एक्स्प्रेस : कल्याण-अंबरनाथ मार्ग तासभर ठप्प

By admin | Published: May 24, 2014 7:59 PM

नागरकोईल एक्स्प्रेसचे इंजीन फेल झाल्याची घटना उल्हासनगर स्थानकादरम्यान शनिवारी दुपारी १.२० च्या सुमारास घडली. डाऊन मार्गावर झालेल्या या समस्येमुळे कल्याण-अंबरनाथ अप मार्ग तासभर ठप्प झाला होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा दुपारच्या वेळेत खोळंबा झाल्याने अतोनात हाल झाले. या गोंधळामुळे त्या गाडीमागून येणारी एक खोपोली लोकल आणि त्यामागून येणार्‍या दोन अंबरनाथ लोकल कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान खोळंबल्या होत्या.

ठाणे : नागरकोईल एक्स्प्रेसचे इंजीन फेल झाल्याची घटना उल्हासनगर स्थानकादरम्यान शनिवारी दुपारी १.२० च्या सुमारास घडली. डाऊन मार्गावर झालेल्या या समस्येमुळे कल्याण-अंबरनाथ अप मार्ग तासभर ठप्प झाला होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा दुपारच्या वेळेत खोळंबा झाल्याने अतोनात हाल झाले. या गोंधळामुळे त्या गाडीमागून येणारी एक खोपोली लोकल आणि त्यामागून येणार्‍या दोन अंबरनाथ लोकल कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान खोळंबल्या होत्या.इंजिनातील तांत्रिक बिघाडामुळे पाऊण तास ही गाडी एकाच ठिकाणी उभी होती. परिणामी, गाडीतील पंखे व अन्य यंत्रणाही बंद झाल्याने प्रवाशांना दुपारच्या उन्हाचा त्रास झाला. दोन-सव्वादोनच्या सुमारास कर्जतवरून एक इंजीन आले आणि त्याच्या साहाय्याने दुपारी २.२९ च्या सुमारास या गाडीने अंबरनाथ स्थानक सोडल्याची माहिती स्थानक प्रबंधक जॉय अब्राहम यांनी लोकमतला दिली. बदलापूर मार्गावर ज्या इंजिनात बिघाड झाला होता, ते बदलून गाडी पुढे धावल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर, या गाडीमुळे खोळंबलेली खोपोली लोकल अर्धा तास विलंबाने डाऊनमार्गे मार्गस्थ झाली. त्यामागोमाग उभ्या असलेल्या अंबरनाथ लोकलचाही मार्ग मोकळा झाला. (प्रतिनिधी)