उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पसंती, यंदा ३० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:29 AM2018-06-27T06:29:44+5:302018-06-27T06:29:47+5:30

उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना टियर टू हा व्हिसा दिला जातो.

England's preference for higher education, up 30 percent this year | उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पसंती, यंदा ३० टक्क्यांनी वाढ

उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पसंती, यंदा ३० टक्क्यांनी वाढ

googlenewsNext

खलील गिरकर
मुंबई : उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना टियर टू हा व्हिसा दिला जातो. गतवर्षी देशातून ११ हजार विद्यार्थी या व्हिसाद्वारे इंग्लंडला गेले होते. यंदा मार्चपर्यंत १५ हजार विद्यार्थ्यांना हा व्हिसा देण्यात आला आहे, अशी माहिती ब्रिटिश काउंन्सिलच्या वेस्ट इंडियाच्या संचालिका हेलन सिल्वेस्टर यांनी ‘लोकमत’ला दिली.
महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे शिक्षण अत्यावश्यक आहे. महिला शिक्षणासाठी ब्रिटिश काउंन्सिल अधिक प्रयत्नशील आहे. त्यामुळे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग व मॅथ्स (स्टेम) या विषयांसाठी केवळ महिलांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या विषयामध्ये मास्टर पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थिनींना एक वर्षाची ट्युशन फी देण्यात आली.
ब्रिटिश काउंन्सिलने इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या व व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी युके अ‍ॅल्युम्नी अवॉर्ड दिले. सुशांत देसाई, रुची शाह या मुंबईकरांसोबत तीन भारतीयांना हा पुरस्कार दिल्याची माहिती सिल्वेस्टर यांनी दिली.
ब्रिटिश काउंन्सिलने डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. त्यामुळे या लायब्ररीचा वापर करणाºयांना माहितीचे मोठे दालन उपलब्ध झाले. या लायब्ररीत २ लाख ५० हजार पुस्तके, विविध विषयांना वाहिलेली १५ हजार जर्नल्स, ८ हजार वृत्तपत्रे आहेत. त्यासाठी वार्षिक १,४०० रुपये इतकी फी आकारली जात असल्याचे सिल्वेस्टर यांनी सांगितले.

Web Title: England's preference for higher education, up 30 percent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.