- महेश चेमटेमुंबई : माथेरान इको सेंसेटिव्ह झोन असल्यामुळे येथे पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. ई-रिक्षाच्या मंजूरीसाठी सनियंत्रण समितीने अहवाल मराठीत सादर केला. तथापि हा अहवाल इंग्रजी भाषेत सादर केल्यानंतर राज्य सरकार मार्फत केंद्राकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता इंग्रजी भाषेमुळे माथेरान ई-रिक्षाचा वेग मंदावला असल्याचे दिसून आले.नुकत्याच झालेल्या बैठकीत पर्यावरण विभागाचे संचालक बी.एन.पाटील यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. केवळ सनियंत्रण समितीचा अहवाल हा मराठीत आहे. तो इंग्रजी भाषेत सादर करावा, अशी सूचना संबंधित अधिकाºयांना दिली. तसा अहवाल मिळाल्यानंतर ई-रिक्षा मंजूरीसाठी त्वरीत केंद्राकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती माथेरान ई-रिक्षा प्रकरणी पाठपुरावा करणारे सुनिल शिंदे यांनी दिली.शहरात ई-रिक्षा वाहनांना प्राधान्य देण्यात यावे, असे सरकारचे धोरण आहे.गेल्या अनेक वर्षांपासून माथेरान ई-रिक्षा प्रकरण पूर्णत्वास येत नाही. भाषेमुळे हे प्रकरण रखडल्याने श्रमिक रिक्षा संघटनेने रायगड जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे इंग्रजीत अहवाल पाठवण्याची मागणी केली.माथेरानमध्ये आजही हातरिक्षापर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली आजही माथेरानमध्ये हातरिक्षा आणि घोडे यांच्यामार्फत वाहतूक सुरु आहे. येथे जवळपास ४०० प्रवासी आणि २०० मालवाहतूक करणारे घोडे आहेत. या घोड्यांची लीद-मूत्रामुळे माथेरानकरांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.
‘इंग्रजी’मुळे अडले माथेरान ई-रिक्षाचे घोडे, अहवाल मराठीत सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:38 AM